व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे.

व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. कोफ्ता साठी साहित्य
  2. 1/5 कपबारीक चिरलेला कोबी, 1/2 कप किसलेला गाजर
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 2 चमचेकॉर्न फ्लोअर
  5. 2 चमचेमैदा
  6. 1/2 चमचाकिचन किंग मसाला
  7. 1 चमचाआले, लसूण, मिरची पेस्ट
  8. 1/2 चमचाधणे पावडर
  9. 1/2 चमचालाल मिरची पावडर
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. तळण्यासाठी तेल
  12. ग्रेव्ही साठी
  13. 1 चमचातेल
  14. 2मोठे कांदे बारीक चिरून
  15. 1बारीक चिरून घेतलेला टोमॅटो
  16. 4-5 लसणाच्या पाकळ्या
  17. 1/2 इंचबारीक चिरून घेतलेले आले
  18. 1 मोठा चमचासुके खोबरे
  19. 1 चमचापांढरे तीळ
  20. 1 मोठा चमचाबारीक चिरलेले काजू
  21. 4 चमचेतेल
  22. 1/2 चमचाजीरे
  23. 7-8कडीपत्ता पाने
  24. 2लाल सुक्या मिरच्या
  25. 1 चमचाकिचन किंग मसाला
  26. 1/2 चमचाधणे पावडर
  27. 2 चमचेलाल मिरची पावडर
  28. 1 मोठा चमचाखवा
  29. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दिड कप कोबी चांगला धुवून व किसून घेतला.

  2. 2

    नंतर अर्धा कप गाजर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले, आणि गाजर किसून घेतले.

  3. 3

    1चमचा तेल गरम झाल्यावर त्यात 2 चिरून घेतलेले कांदे घालून चांगले सोनेरी रंगावर परतून घेतले. मग त्यात 1/2 इंच आले, 5-6 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो, 1मोठा चमचा सुके खोबरे, तीळ आणि काजूचे तुकडे घालून टोमॅटो चांगला मऊ झाल्यावर 5 ते 7 मिनिटे परतून घेतला. व थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतले.

  4. 4

    आता बारीक चिरलेला कोबी, किसून घेतलेला गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, धणे पावडर, लसूण, आले, हिरवी मिरची पेस्ट घालून चांगले मिक्स करून घेतले. मग त्यात कॉर्न फ्लोअर, मैदा, मीठ घालून चांगले मिक्स करून घेतले.

  5. 5

    मग त्यात एक चमचा पाणी घालून घट्ट पीठ मळून घेतले. मग त्याचे गोळे बनवून ते मधोमध दाबून चपटे वडे करून घेतले.

  6. 6

    नंतर एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात बनवून घेतलेले वडे घालून चांगले तळून घेतले.

  7. 7

    आता एका पॅन मध्ये तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात एक चमचा जीरे, कडीपत्ता पाने, 2 सुक्या मिरच्या, आणि वाटून घेतलेला मसाला चांगला मिक्स करून मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटे परतून घेतले.

  8. 8

    मग त्यात किचन किंग मसाला,धणे पावडर, लाल मिरची पावडर, खवा आणि मीठ घालून मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घेतले. मग ग्रेव्ही मध्ये पाणी घालून मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटे शिजवून घेतले. नंतर गॅस बंद करून आपली व्हेज मराठा तयार.

  9. 9

    आता व्हेज मराठा सर्व्ह करताना सर्व्हिंग बाउल मध्ये तळलेले कोफ्ते ठेऊन त्यावर ग्रेव्ही घालून सर्व्ह करावा. किंवा आधी ग्रेव्ही घालून त्यावर तळलेले कोफ्ते घालून सुद्धा खूप छान लागते व्हेंज मराठा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

Similar Recipes