सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB12 #W12

हिवाळा आणि रंगबेरंगी भाज्यांनी सजलेली मंडई हे नेत्रसुखद दृश्य अनुभवावं मग एखाददुसरी भाजी घेऊ म्हणून पिशव्या ओसंडून वाहेस्तोर भाज्या घ्यायच्या🤩.मनांत लगेच वेगवेगळे बेत शिजवत घरी परतायच. परवा लेकीसह बाजारहाट झाला मग मनसोक्त भाज्यांबरोबर बेत ही ठरले. घरी आल्यावर सकाळीच केलेल ताज लोणी होत मग लगेच सरसो दा साग मक्के दी रोटी ठरलच😊 ह्या भाजीला घरच्या लोण्याशिवाय मजा नाही हेच खर. मग काय लगेच मदतनीस ताई भाज्या निवडून द्यायला तयार पटापट भाजी कुकरला शिजवून गरम पाण्यात मक्याच पीठ भिजवून गरमागरम भाजी चुरचुरीत साजुक तुपातली फोडणी घालून तव्यावरची गरम रोटी,लोण्याचा गोळा बरोबर थोडा कांदा,मुली आणि छोटासा गुळाचा खडा बास...... पोहचलोच समजायच पंजाबमधील शेतात🤩😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपसरसोची पान (मोहरीची पान)
  2. 1/2 कपबथुवा ची पान
  3. 1/2 कपबारीक चिरलेला पालक
  4. 1/4 कपमेथी
  5. 1मध्यम कांदा बारिक चिरून
  6. 2 टीस्पूनआल लसुण हिरवी मिरची पेस्ट
  7. 2 टेबलस्पूनमक्याच पीठ
  8. पाणी गरजेनुसार
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 4 टेबलस्पूनसाजुक तुप
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    मोहरीची पान,बथुवा,पालक,मेथी ह्या भाज्या स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घ्याव्यात.
    कुकरमधे डब्यात थोड पाणी घालून एक शिट्टीत शिजवून घ्याव्यात.

  2. 2

    शिजलेल्या भाज्या गार झाल्यावर मिक्सरमधून फीरवुन पेस्ट करून घ्यावी.
    आता एका कढईत साजुक तुपात कांदा परतुन त्यावर आल,लसुण,हिरवी मिरची पेस्ट परतून घ्यावी. तयार भाज्यांची पेस्ट घालून परतून घ्यावे. भाजीला घट्टपणा येण्यासाठी 2 टेबलस्पून पाण्यात मक्याच पीठ घालून तयार पेस्ट भाजीत घालावी. भाजीला एक ऊकळी आली की भाजी तयार.

  3. 3

    एका छोट्या कढईत 2 टेबलस्पून साजुक तुपवर मोहरी व लसणाची फोडणी करावी त्यात लाल मिरची घालावी. तयार फोडणी सरसोच्या सागवर घालावी.

  4. 4

    गरमागरम सरसो का साग मक्के दी रोटी, कांदा,गाजर व कोवळ्या मुळा, घरच्या ताज्या लोण्याचा गोळा व गुळाचा खडा वाढून अस्सल पंजाबी बेत साजरा करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes