मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#cpm7
खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी.

मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)

#cpm7
खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपबासमती तांदूळ
  2. 4 टेबलस्पूनहिरवी मुग डाळ
  3. 4 टेबलस्पूनमसुर डाळ
  4. 2 टेबलस्पूनसालपटांची ऊडीद डाळ
  5. 2 टेबलस्पूनहरबरा डाळ
  6. 1मध्यम कांदा बारिक चिरून
  7. 5-6कडीपत्तायाची पान
  8. 1/4 कपटोमॅटोची प्युरी
  9. 1 टेबलस्पूनआल लसुण पेस्ट
  10. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 4 टेबलस्पूनसाजुक तुप
  13. 2साबीत लाल मिरची
  14. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. मीठ चवीनुसार
  17. 2-3लसुण पाकळ्या

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    हरबरा डाळ व ऊडीद डाळ 10 मिनिट पाण्यात भिजत घालावी. बाकीच्या डाळी व तांदुळ धुवून घ्यावेत. बाकीचे साहित्य मोजुन एकत्रीत ठेवावे

  2. 2

    आता एका प्रेशरपॅन मधे साजुक तुप घालून फोडणी करून त्यात कांदा,आले-लसूण पेस्ट,मसाले,मीठ व धुतलेले डाळ तांदूळ घालावे हलकेच परतून टोमॅटोची प्युरी घालावी. गरजेनुसार पाणी घालून प्रेशरपॅनच्या 3 शिट्टीत खिचडी शिजवून घ्यावी.

  3. 3

    कुकर दबल्यावर एका कढईत 2 टेबलस्पून साजुक तुप घालून फोडणी करून त्यात लसुण पाकळ्या व लाल मिरची घालून फोडणी तयार करून घ्यआवी. गरमागरम मिक्स डाळीची खिचडी पापड,लोणच,दही आणि साजुक तुपा बरोबर वरून खमंग फोडणी घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes