पालक- मेथी साग आणि मक्के की रोटी (palak methi saag n makke ki roti recipe in marathi))

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#उत्तर
सागचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, लोकप्रिय साग म्हणजे सरसोंका साग.
पण मिक्स साग, पालक साग, पालक मेथी साग आसे वेगवेगळे प्रकार आहेत. आज मी बनवला आहे पालक - मेथी साग बनवला आहे. चला रेसिपी बघुया.🙂

पालक- मेथी साग आणि मक्के की रोटी (palak methi saag n makke ki roti recipe in marathi))

#उत्तर
सागचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, लोकप्रिय साग म्हणजे सरसोंका साग.
पण मिक्स साग, पालक साग, पालक मेथी साग आसे वेगवेगळे प्रकार आहेत. आज मी बनवला आहे पालक - मेथी साग बनवला आहे. चला रेसिपी बघुया.🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3  सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅम पालक
  2. 200 ग्रॅम मेथीची भाजी
  3. 2 टेबलस्पूनबेसन
  4. 1-2हिरव्या मिरच्या
  5. 10-12लसूण पाकळ्या
  6. 2-3लाल सुक्या मिरच्या
  7. 2 टेबलस्पूनतुप
  8. 1 टिस्पून लाल तिखट
  9. 1/2 टिस्पून हळद
  10. 1 टिस्पूनजीरे
  11. 1/4 टिस्पूनहिंग
  12. मीठ चवीनुसार
  13. मक्याच्या रोटीसाठी
  14. 1 कपमक्याचे पीठ
  15. तुप लावण्यासाठी
  16. 2 टेबलस्पूनगव्हाचे पीठ (रोटी थापण्यासाठी)

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम पालक, मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. नंतर कुकरमध्ये घालून त्या मध्ये मीठ, हिरवी मिरची, लाल तिखट, थोडे पाणी घालावे.

  2. 2

    तीन शिट्ट्या होऊ द्यावा. नंतर पळीने घोटून घ्या. बेसन मध्ये पाणी घालून घोळ बनवून घ्या.

  3. 3

    तयार बेसन घोळ शिजवलेल्या भाजीत घालून मिक्स करा. 10 मिनिटे शिजवून घ्या.

  4. 4

    कढईत तूप गरम करून त्यात जीरे, लसूण,लाल सुक्या मिरच्या, हिंग घालून फोडणी करा. नंतर लाल तिखट, हळद घालून मिक्स करा. शिजवलेला साग घालून मिक्स करा.

  5. 5

    5 मिनिटे साग शिजवून घ्यावे. साग तयार आहे.

  6. 6

    मक्याच्या रोटी साठी एक परातीत पीठ घेऊन त्यात गरम पाणी घालून मीठ मळून घ्यावे. गव्हाचे पीठ घेऊन त्या वर पीठाचा गोळ ठेवा.

  7. 7

    हाताने रोटी थापून घ्या. तवा गरम करून तव्यावर टाकून रोटीला पाणी लावून घ्यावी.

  8. 8

    पलटी करून घ्यावी. खालून भाजल्यावर डायरेक्ट गँस वर ठेवून भाजून घ्यावे. नंतर तुप लावावे.

  9. 9

    गरमागरम साग आणि मक्के की रोटी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes