प्रोटीन पावर  पॅक खिचडी (protien power pack khichdi recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#kr
सध्याच्या भयावह वातावरणात स्वच्छ,ताड जेवण्यावर भर दिला जातोच आहे पण प्रोटिनयुक्त आहार ह्या करोनाला हरवण्यासाठी मदतगार सिध्द होतोय त्यामुळेच डाॅक्टरही प्रोटीनच प्रमाण वाढवा अस सांगतात पण शाकाहारी लोकांसाठी डाळी व कडधान्य हेच प्रोटीनचे उत्तम source नाही का. मग हेच पदार्थ वापरून आजची ही प्रोटीन पावर पॅक खिचडी केली आहे😊 तशीही खिचडी आपल्या भारताची नॅशनल डीश आहे मग ती पौष्टिक तर असणारच.#kr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅमतांदुळ
  2. 25 ग्रॅमहिरवी मुग डाळ
  3. 1/4 कपमोड आलेली मटकी
  4. 1/4 कपमोड आलेले मसुर
  5. 1मध्यम कांदा बारिक चिरून
  6. 1मध्यम बटाटा चिरून
  7. 1/2 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  8. 1/2टमाटा बारिक चिरून
  9. 1/2शिमला मिरची बारीक चिरून
  10. 1/4 कपबारिक चिरलेल गाजर
  11. मीठ चवीनुसार
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  14. 1/4 टीस्पूनधणेपुड
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/8 टीस्पूनहिंग
  17. 1 कपपाणी
  18. 2 टेबलस्पूनसाजुक तुप
  19. 1/4 टीस्पूनमोहरी जीरे
  20. वरून फोडणीसाठी
  21. 1 टेबलस्पूनसाजुक तुप
  22. 1/4 टीस्पूनबेडगी मिरची पावडर
  23. सजावटीसाठी पापड,लोणच,लींबु

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ डाळ धुवून भिजत ठेवावे. बाकीच्या भाज्या चिरून घ्याव्यात.

  2. 2

    आता कुकरमधे तुप घालून फोडणी करून त्यावर कांदा,शिमला मिरची,गाजर,बटाटा परतून घ्यावेत.

  3. 3

    आता फोडणीतआलं लसुण पेस्ट,टमाटा घालून परतून घ्यावे. टमाटा शिजत आल्यावर लाल तिखट,मीठ,हळद,हिंग,धणेपुड घालून परतून घ्यावे. आता धुवून ठेवलेले डाळ तांदुळ,मोड आलेली मटकी,मसुर घालून परत 1 मिनिट परतून घ्यावे.

  4. 4

    आता आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या कराव्यात कुकर दबल्यावर खिचडी बाऊलमधे काढून वरून साजुक तुपाची फोडणी करून त्यात बेडगी मिरची पावडर घालून खिचडी सर्व्ह करावी.

  5. 5

    गरमागरम प्रोटीन पावर पॅक खिचडी तडका घालून पापड,लोणच व लींबा बरोबर सर्व्ह करावी.😊😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes