इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)

Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
Mumbai

इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते.

इडली सांबर (Idli sambar recipe in marathi)

इडली सांबर दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट असला तरी संपुर्ण भारतात नव्हे जिथे जिथे भारतीय आहेत तिथे तिथे आवडीने खाली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 3वाटया तांदूळ
  2. 1 वाटीउडीद डाळ
  3. 1/4 चमचाखायचा सोडा
  4. थोडेसे तेल
  5. चवीपुरते मीठ
  6. सांबार बनवण्यासाठी
  7. 1/4 किलोतुरडाळ
  8. 1 नगटोमॅटो
  9. 1 नगकांदा
  10. 3 चमचसांबार मसाला
  11. चिंच चवीनूसार
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे
  14. फोडणीसाठी तेल
  15. चिमूटभरहिंग
  16. 1/2 चमचाजीरे
  17. कढीपत्ता
  18. 1/2चमचामोहरी
  19. 2-3लाल सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ व डाळ धुऊन वेगवेगळे भिजत ठेवावे आणि सात ते आठ तासानंतर ते मिक्सरमधुन वाटून घ्यावे. हे मिश्रण रात्रभर ठेवावे.

  2. 2

    इडली करण्याच्या वेळी त्यात सोडा व मीठ टाकावे व ढवळून घ्यावे

  3. 3

    इडली पात्राला तेल लावून त्यात प्रत्येक साच्यात थोडे-थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात. सात ते आठ मिनिटे त्याला वाफ आणावी.

  4. 4

    सांबार बनवण्यासाठी, डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा आणि ते शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी.

  5. 5

    उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा.उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जीरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.इडली आणि सांबार खाणाऱ्यांना हवे तसे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nishigandha More
Nishigandha More @coopad_2022Nishi
रोजी
Mumbai
Food Lover| Home Cook| Influencer | Talks about #food|#recipes |#blogging|Journalist| Content Creator |Food Blogger |Mother||In search of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes