मालवणी सुरमई  मसाला फ्राय (Malvani surmai masala fry recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#MBR

चमचमीत मालवणी मसाल्यातील ही सुरमई फ्राय चवीला फार भन्नाट लागते..😋😋
सोबतीला तांदळाची गरमागरम भाकरी , वाफाळता भात, सुरमईचा सार, सोलकढी असली की जेवणाची चव आणखी वाढते.
चला तर मग पाहूयात चमचमीत मालवणी सुरमई फ्राय..😋

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ मि.
४ जणांसाठी
  1. सुरमई चे पिसेस धुऊन स्वच्छ केलेले
  2. 1/4 कपआलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट
  3. कोकम आगळ
  4. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला
  5. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  6. 1 टिस्पून हळद
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल
  9. 1/2 कपरवा
  10. 1/4 कपतांदळाचं पीठ

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    सुरमईला कोकम आगळ लावून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट,लाल तिखट,मालवणी मसाला, हळद, मीठ चवीनुसार घालून छान मिक्स करा.

  3. 3

    एका प्लेटमधे रवा, तांदळाचं पीठ थोडं लाल तिखट,हळद,मसाला,मीठ घालून छान एकत्र करा. व मसाला लावलेली सुरमई यामधे‌ घोळवून‌ घ्या.

  4. 4

    पॅनमधे तेल गरम करून त्यात ही सुरमई छान दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.

  5. 5

    खायला तयार आहे चमचमीत मालवणी सुरमई फ्राय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (3)

यांनी लिहिलेले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes