साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.
साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित..😂

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ मि.
२ ते ३ जणांसाठी
  1. 2 कपसाबूदाणा
  2. 1/2 कपशेंगदाणा कूट
  3. 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  4. मीठ चवीनुसार
  5. तूप,जीरे
  6. 1उकडलेला बटाटा
  7. 1 टिस्पून साखर

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    साबूदाणा रात्रभर भिजवून घ्या. पॅनमधे तूप गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, जीरे घालून छान खमंग परतून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात बटाट्याच्या फोडी घालून‌ लालसर होईपर्यंत परतून‌ घ्या. नंतर त्यात भिजवलेला साबूदाणा, शेंगदाणा कूट,मीठ,साखर घालून छान‌ परतून‌ घ्या. १० मि.खिचडी वाफेवर शिजवून‌ घ्या.

  3. 3

    खमंग साबूदाणा खिचडी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes