बटाटा-कोथिंबीर पराठा(Batata Kothimbir Paratha Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#TBR
दररोजची सकाळ खूपच धावपळीची असते.एकतर डब्याला मुलांना काय द्यायचे यासाठी आदल्या रात्रीपासूनच पूर्वतयारी करावी लागते.घरचे ताजे,स्वच्छ, पोटभरीचे देण्याची प्रत्येक आईची धडपड असते.आपल्या मुलाने मधल्यासुट्टीत पोटभर खावे हीच बिचाऱ्या आयांची इच्छा असते.मुलांच्याही टिफीनसाठीच्या फर्माईशी काही कमी नसतात.त्याप्रमाणे डबा दिला की कंपनी खूश होते.जरा जरी आवडीची भाजी नसेल तर डबा परत आलाच म्हणून समजा...नाहीतर डबा exchange!!भारी हुशार असतात मुलं.काही मुलांना शाळेच्याही बरंच आधी क्लासेस वगैरेसाठी निघावं लागतं,अशावेळी वेळेनुसार भुकेचे नियोजन करुन हेल्दी असा डबा द्यावा लागतो.सकाळचा,दुपारचा,छोट्या सुट्टीतला आणि पाण्याची बाटली,इतरही कोरडा खाऊ असे ,सगळे दिले की पोट भरलेले रहाते आणि अभ्यासही सुचतो.काही वेळा मधल्या सुट्टीत खेळायला मिळावे म्हणूनही डबा तसाच पडून रहातो.चार वेळा थोडे थोडे आवडीचे दिले की मुलं खातातही.आईला स्वयंपाकात त्यासाठी विविधता आणावी लागते.एखादे फळ,फळांच्या फोडी,पौष्टिक लाडू असं जास्तीचंही द्यावं लागतं.कधीतरी एखादा पदार्थ विकतचा आवडीनुसार द्यावा लागतो.मुलांनी डबा संपवलेला पाहूनच आईचं पोट भरतं..हो ना?आजचा मऊसूत असा बटाटा पराठाही मुलांना आवडेल असाच...मोठेही खाऊ शकतील,दही,सॉस,बटरचीज या बरोबर!👍😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिटे
5व्यक्ती
  1. 6 डावकणिक
  2. 6बटाटे उकडलेले
  3. 1वाटीभर चिरलेली कोथिंबीर किंवा जास्तही चालेल
  4. 1/2 वाटीतेल
  5. 2 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनहळद (ऐच्छिक)
  7. 4हिरव्या मिरच्या
  8. 1/4 इंचआलं
  9. 8-10लसूणपाकळ्या
  10. 2 टीस्पूनधणे जीरे पूड
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  13. 1/4 वाटीपाणी-अगदी जरुरीपुरते
  14. पराठे भाजताना जरुरीप्रमाणे तेल

कुकिंग सूचना

45मिनिटे
  1. 1

    वरील घटकांनुसार सर्व साहित्याची तयारी करुन घ्यावी.बटाटे मऊ शिजवून घ्यावेत.सोलावेत.कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आलं-मिरची-लसुण पेस्ट करुन घ्यावी.

  2. 2

    बटाटे किसणीवर किसून घ्यावेत.कणिक परातीत घेऊन पुरेसे तेल घालावे,किसलेले बटाटे,चिरलेली कोथिंबीर, आलं-मिरची-लसूण पेस्ट,धणेजीरे पूड, गरम मसाला, मीठ घालावे.

  3. 3
  4. 4

    आमचूर पावडर घालावी.सर्व साहित्य एकत्र करावे.व खूप एकजीव करावे. बटाट्याचा जेवढा ओलसरपणा व चिकटपणा आहे त्याला सर्व कणिक लागायला हवी.पाणी घालायची घाई करु नये.सर्व मिश्रण एकजीव व घट्ट झाले असे दिसल्यावरच अगदी थोडे पाणी घालावे.व पराठा लाटता येईल अशी कणिक भिजवावी.

  5. 5

    आता मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घेऊन थोड्या कणकेवर लाटावा.पोळी करताना जशी घडी घालतो तशी तेल लावून घडी घालावी व पराठा पातळ लाटावा.नॉनस्टिक तव्यावर भाजावा.

  6. 6

    दोन्ही बाजूंनी चमच्याने तेल लावून पराठा मस्त भाजावा.घडी घातल्याने पराठा फुगतोही छान!

  7. 7

    अतिशय मऊ लुसलुशीत असा चविष्ट पराठा तयार आहे.थोडा कोमट असताना कँसरोलमध्ये भरुन ठेवावा.डब्यामध्ये देताना घडी किंवा रोल करावा.एखादी कोरडी चटणी,दही याबरोबर डब्यात द्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes