मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#PBR
पराठ/पंजाबी रेसिपीस
हिवाळ्यात हिरवे मटार खूप छान मिळतात. मटार पराठा ही रेसिपी करून बघितली. खूप छान झाली.

मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)

#PBR
पराठ/पंजाबी रेसिपीस
हिवाळ्यात हिरवे मटार खूप छान मिळतात. मटार पराठा ही रेसिपी करून बघितली. खूप छान झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1/2 वाटीमटारचे दाणे
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 6-7लसूण पाकळ्या
  4. 1/2 इंचआले
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर किंवा चाट मसाला
  8. तेल
  9. १.१/४ कप गव्हाच्या पिठाची मळलेली कणिक

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    चपातीसाठी कणिक मळतो तसे कणिक मळून ठेवणे. एका कढईत तेल घालून तापत ठेवणे.तेल तापले की त्यांचे घालून फुलू देणे. नंतर त्यात लसूण पाकळ्या व हिरवी मिरची घालून अर्धा मिनिट परतणे.

  2. 2

    गरम मसाला व आमचूर पावडर घालून मिक्स करून घेणे.नंतर मटार घालून परतणे. मटारचा जरासा रंग बदलला की, गॅस बंद करणे. मिश्रण थंड होऊ देणे.
    *आमचूर पावडर किंवा चाट मसाल्यामध्ये मीठ असतेच. त्यामुळे मी इथे मीठ घातलेले नाही. तुम्ही चव घेऊन मीठ घालू शकतात.

  3. 3

    परतलेले मिश्रण थंड झाले की, मिक्सरच्या भांड्यात घालून चालू बंद करून एक दोन वेळा फिरवून घेणे. मिश्रण जास्त बारीक करायचे नाही. एका डिश मध्ये मिश्रण काढून घेणे. मळलेल्या कणकेचा एक छोटासा गोळा घेऊन, पारी करणे व त्यात थोडेसे सारण घालून घेणे.

  4. 4

    उंडा व्यवस्थित बंद करून घेणे व चपटा करणे. कोरडे पीठ लावून पराठा लाटून घेणे.तव्याला तेल लावून घेणे व त्यावर पराठा टाकणे. दुसऱ्या बाजूने तेल लावून, पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेणे.

  5. 5

    अशाप्रकारे मटारचे सर्व पराठे करून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes