ओनियन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

उरलेल्या डोशाच्या पिठाचा केलेला हा उत्तप्पा अतिशय टेस्टी होतो

ओनियन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)

उरलेल्या डोशाच्या पिठाचा केलेला हा उत्तप्पा अतिशय टेस्टी होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीउरलेलं डोशाचे पीठ
  2. 1कांदा, एक बीट रूट व थोडीशी कोथिंबीर
  3. 1/4 चमचाचिली फ्लेक्स
  4. उत्तप्पा सोडण्यासाठी एक मोठा चमचा बटर
  5. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    बीटरूट साल काढून किसून घ्यावा कांदा उभा बारीक पातळ कापावा कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी व सगळ्याला मीठ लावून ठेवावे

  2. 2

    डोशाच्या पिठात मीठ घालावे व ते एकजीव करून ठेवावे नंतर कास्ट आयन तवा गॅसवर ठेवून तो तापला की त्यावर पाणी शिंपडून फडक्याने पुसून घ्यावे मग तेल शिंपडावे व फडक्याने पुसून घ्यावे मग डोशाचं निम्म पीठ त्याच्यावर घालून जाडसर उतपा घालावा त्यावर मीठ लावलेल्या भाज्या घालून चिली फ्लेक्स घालावे व झाकून ठेवावे सगळं मंद गॅसवर करावे साईडने बटर सोडावे व वरतीही बटर टाकावे

  3. 3

    एका साईडने गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याला उलटून दुसऱ्या साईडने परत बटर सोडून छान फ्राय करावा म्हणजे वरती सर्व भाज्या मस्त फ्राय होतात व उत्तप्पा छान लागतो असाच दुसराही उत्तप्पा करावा कास्ट आयन च्या तव्यामुळे उत्तप्याची चव खूप सुंदर येते व खुसखुशीत होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes