कुकर बटन केक (Cooker Button Cake Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#CCRघरी रोज सर्वांना काहीतरी नवीन हवंच असतं .चहा बरोबर कांही तरी खावसं वाटतंच ! मस्तपैकी झटपट होणारी पार्ले जी बिस्किटांचा बटण केक मी बनवला आहे.
तुम्हीही करून पहा . चला याची कृती पाहू ....

कुकर बटन केक (Cooker Button Cake Recipe In Marathi)

#CCRघरी रोज सर्वांना काहीतरी नवीन हवंच असतं .चहा बरोबर कांही तरी खावसं वाटतंच ! मस्तपैकी झटपट होणारी पार्ले जी बिस्किटांचा बटण केक मी बनवला आहे.
तुम्हीही करून पहा . चला याची कृती पाहू ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 40 मिनिटं
4 ते 5 व्यक्ती
  1. 4पॅक पार्ले जी बिस्कीटे (52 बिस्किटे)
  2. 6 टेबलस्पूनपिठीसाखर
  3. दीड टीस्पून कोको पावडर
  4. 1 कपदूध (आवश्यकते नुसार कमी जास्त)
  5. 1 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

30 ते 40 मिनिटं
  1. 1

    सर्व बिस्किटांचे लहान तुकडे करा. मिक्सरवर फिरवून त्याची पावडर करा.ती चाळणीने चाळून घ्या.

  2. 2

    चाळलेल्या बिस्कीट पावडर मध्ये पिठीसाखर व कोको पावडर पण चाळून घाला. मिश्रण छान मिक्स करा.
    कुकरमध्ये वाळू टाकून, ती गॅसवर तापणेस(प्री हिट) ठेवा. केक पात्रास तुपाचे ग्रिसिंग करून, त्यांवर मैदा किंवा गहू पीठ भरभरून, प्लेट्स तयार करा.

  3. 3

    बिस्किट पावडर मिश्रणात, थोडे थोडे दूध टाकत मिश्रण छान मिक्स करा. त्यांत इनो पावडर टाकून, त्यांवर पाणी ओता. मिश्रण एकाच दिशेने फेटा. फेटलेले मिश्रण केक पात्रात ओता.
    तयार झालेले केक प्लेट्स कुकर मध्ये ठेवा. त्याला झाकण लावून, शिट्टी काढून घ्या. वाळू आधीच तापल्यामुळे, गॅस फ्लेम मिडीयम वर ठेवून, 25 ते 30 मिनिटे केक बेक होऊ द्या.

  4. 4

    30 मिनिटांनंतर कुकर चे झाकण काढून, टूथ पीक ने केक झाल्याची खात्री करा.प्लेट्स गार झाल्यावर, चाकूने केकच्या कडा मोकळ्या करा व ती केक बटणं प्लेटमध्ये काढा व गरम गरम चहा बरोबर सर्व्ह करा. व मज्जा लुटा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes