शाही शेवाई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#CookpadTurns6

बर्थ डे पार्टी म्हणजे खाण्याची नुसती रेलचेल असते . तिखट ,गोड, चटपटीत सर्व प्रकार असतात . आज मी मस्त असा शेवयांचा शाही शिरा बनवलाय .जो साऱ्यांनाच आवडेल . दुध पावडर ,साखर ,तूप , वेलदोडे , भरपूर सुका मेवा ... असे घटक असल्यावर पदार्थ मस्तच होणार ..
आता त्याची कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 व्यक्ती
  1. 1 कपशेवाई
  2. 1/2 कपसाखर (आवडीनुसार)
  3. दीड टेबलस्पून तूप
  4. दीड टेबलस्पून दूध पावडर
  5. 1 टेबलस्पूननारळाचा चव
  6. 1 टीस्पूनवेलची पूड
  7. काजू,बदाम,अक्रोड, पिस्ता काप,मनुके
  8. 3 कपपाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    गॅसवर कढईत तूप तापवा. त्यांत मनुके टाका. ते थोडेसे फुलले कीं, त्यांत नारळाचा चव टाका. जरासा परतल्यावर त्यांत शेवया टाकून भाजून घ्या.

  2. 2

    गॅसची फ्लेम बारीक करून, त्यांत दूध पावडर टाका. पाणी कडक तापवून, भाजलेल्या शेवया वर ओतून छान ढवळा व झाकून, 5 - 7 मिनिटे त्याला छान वाफ येऊ द्या. शेवाया शिजल्याची खात्री झाल्यावर त्यांत साखर टाका. व्यवस्थित मिक्स करून, गॅसची फ्लेम बारीक करून शिऱ्या ला पुन्हा 5 - 7 मिनिटे वाफवा.

  3. 3

    शिरा छान शिजल्यावर, त्यांत वेलची पूड व थोडेसे काजू बदाम अक्रोड चे काप टाका. छान मिक्स करा.
    मस्त शाही शेवया शिरा तयार !
    गरम गरम सर्व्ह करताना उरलेले सुक्या मेव्याचे काप पेरा व मज्जा मज्जा लुटा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes