अमृततुल्य मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#LCM1 या टास्क साठी मी अमृततुल्य मसाला चहा विथ चहाचा मसाला, ही रेसिपी मी पोस्ट करत आहे.

अमृततुल्य मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

#LCM1 या टास्क साठी मी अमृततुल्य मसाला चहा विथ चहाचा मसाला, ही रेसिपी मी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 1/2 चमचालवंग
  2. 1/2 चमचाकाळेमिरी
  3. 1/2 चमचादालचिनी
  4. 1 चमचाहिरवी वेलची
  5. 1 चमचाबडीशेप
  6. 1 चमचासुंठ पावडर
  7. मसाला चहा साठी साहित्य
  8. 1 कपपाणी
  9. 2 चमचेचहा पावडर
  10. 4 चमचेसाखर
  11. 1 कपदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    मंद गॅसवर एका पॅन मध्ये 1/2 चमचा लवंग 1/2 चमचा काळेमिरी,1/2 चमचा दालचिनी,1 चमचा वेलची, 1 चमचा बडीशेप, घालून 2 ते 3 मिनिटे परतून घेतले. आणि गॅस बंद करून मग त्यात 1 चमचा सुंठ पावडर घालून सर्व साहित्य एकत्र करून थंड करून घेतले.

  2. 2

    मग थंड झालेले मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेतले. हा चहाचा मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवला, तर बरेच दिवस चांगला रहातो.

  3. 3

    नंतर मध्यम गॅसवर एका पातेल्यात 1 मेजरिंग कप पाणी उकळत ठेवले. आणि त्यात 1 चमचा चहा पावडर घालून, मग त्यात 1/4 चमचा चहाचा मसाला घालून, मंद गॅसवर चहा 3 मिनिटे चांगला उकळवून घेतला. आणि त्यात 1 कप दूध घालून, 1चमचा साखर घालून, चमच्याने ढवळून पुन्हा 1-2 मिनिटे उकळून, आपला मसालेदार अमृततुल्य चहा पिण्यासाठी तयार.

  4. 4

    आता पिण्यासाठी तयार आहे आपला अमृततुल्य मसाला चहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
शीतल पाटील मॅम मी तुमची चहा रेसिपी कुक्सस्नॅप केली आहे.

Similar Recipes