रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#PR सेलिब्रेशन पार्टी म्हणजे केक तो बनता ही है!
मग तो जर रव्याचा असेल. तर कुठलाही आरोग्याचा विचार न करता आपण केकवर कितीही ताव मारू शकतो. मग त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी हा माझा प्रयत्न.

रवा मावा केक (Rava Mawa Cake Recipe In Marathi)

#PR सेलिब्रेशन पार्टी म्हणजे केक तो बनता ही है!
मग तो जर रव्याचा असेल. तर कुठलाही आरोग्याचा विचार न करता आपण केकवर कितीही ताव मारू शकतो. मग त्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी हा माझा प्रयत्न.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
पाच -सहा जणांसाठी
  1. 1 कपरवा
  2. ५० ग्रॅमअमूल बटर
  3. अर्धा कपपिठीसाखर
  4. पाव कप दही
  5. दूध
  6. वेलची पूड
  7. इनो
  8. डायफूट्
  9. आवश्यक असल्यास तेल

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात ५० ग्रॅम बटर घेऊन आणि अर्धा कप पिठीसाखर घेऊन चांगले फेटून घ्या. (बटर आणि पिठीसाखर चांगली एकजीव करून मऊसर झाली पाहिजे.) हे केल्यास केक स्पंजी होतो.

  2. 2

    आता त्यात १ कप भाजून घेतलेला रवा मिक्स करून त्यात पाव कप दही, पाव कप दूध, १ चमचा तेल घालून छान मिक्स करून घ्या. नंतर त्यात पाव कप किंवा त्याहून थोडा जास्त खवा (मावा) घालून त्यावर वरून वेलची पूड घालून हे सर्व मिश्रण अगदी चांगले फेटून१५ मिनिटे हे मिश्रण बाजूला झाकून ठेवा जेणेकरून रवा चांगला फुगून येईल.

  3. 3

    तोपर्यंत दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून एका कढईत खाली कमी उंचीचे स्टॅण्ड ठेवून कढईवर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवा. व एका बाजूला केक पात्रात तळाशी थोडा बटर लावून त्यावर बटर पेपर घालून त्यावर ही चारही बाजूने बटर लावून घ्या.

  4. 4

    आता बाजूला ठेवलेल्या रव्याच्या मिश्रणात एक मोठा चमचा इनो घालून त्यावर ते ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडे दूध घालून एकदा हे फेटून हे मिश्रण केक पात्रात ओता. वरून सजावटीसाठी डा्यफूट स घाला.हे मिश्रण पात्रात समान पातळीवर ठेवून म्हणजे (केक पात्राच्या अर्धे घेऊन कारण केक बेक झाला की तो वर फुगून येतो.) हे केक पात्र आता कढईत स्टॅण्ड वर ठेवून वरून झाकण ठेवून गॅस मंद आचेवर 30 मिनिटे ठेवा.

  5. 5

    नंतर केक मध्ये सुरी घालून चेक करा. सुरीला केक लागला नाही म्हणजे आपला केक तयार आहे. गॅस बंद करून केक ५-१० मिनिटांनी बाहेर काढून एका पसरट डिश मध्ये काढून आणखी वरून डा्यफूट किंवा चाॅकलेट वरून किसून सव्हऀ करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

Similar Recipes