मूग- मटार (Moong Matar Recipe In Marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#MR
कोणतीही डाळ भिजवुन , भाजीत वापरली कीं, त्या भाजीची पोषकता वाढते . त्यांत गाजर ,मटार, खोबरे कीस, कांदा ,लसूण ,आलं ,असे घटक वापरल्याने भाजी चविष्ट तर होतेच , पण ती पौष्टिकही होते . सगळेच आवडीने खातात . चला कृती पाहू....

मूग- मटार (Moong Matar Recipe In Marathi)

#MR
कोणतीही डाळ भिजवुन , भाजीत वापरली कीं, त्या भाजीची पोषकता वाढते . त्यांत गाजर ,मटार, खोबरे कीस, कांदा ,लसूण ,आलं ,असे घटक वापरल्याने भाजी चविष्ट तर होतेच , पण ती पौष्टिकही होते . सगळेच आवडीने खातात . चला कृती पाहू....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 व्यक्ती
  1. दीड टेबलस्पून मुग डाळ
  2. 1 वाटी मटार
  3. 2गाजर
  4. 1कांदा
  5. 4-5लसूण पाकळ्या
  6. 2" आलं
  7. 1 टेबलस्पूनखोबरे कीस
  8. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  9. 1 टीस्पूनकाळा मसाला
  10. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. चवीपुरते मीठ
  13. 1 टीस्पूनगुळ
  14. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  15. 7-8कढीपत्ता पाने
  16. 1 वाटीपाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    मुग डाळ 2 -3 तास भिजत घाला. गाजराच्या फोडी करा. कांदा, लसूण, आलं व खोबरे किस मिक्सरवर फिरवून वाटण तयार करा.

  2. 2

    गॅसवर कढईत तेलाची फोडणी करून, त्यांत मोहरी, जीरे टाकून तडतडू द्या. फोडणीत कढीपत्ता, लाल तिखट, हळद, वाटण,मूग डाळ,गाजर, व मटार दाणे टाकून फोडणी छान परता.त्यांत एक वाटी पाणी टाकून, काळा मसाला, किचन किंग मसाला, गूळ,मीठ टाकून मिश्रण पुन्हा परता व कढईवर झाकण झाकून 5 मिनिटे छान वाफ येऊ द्या.

  3. 3

    मस्तपैकी चविष्ट व पौष्टिक अशी मुगडाळ - मटार भाजी तयार झाली. गरम गरम भाजीवर कोथिंबीर पेरून सर्व्ह करा व पौष्टिक, चविष्ट भाजीचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes