अंबाडी भाजी

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#RJR
दिवसभर कामं धामं करून ,थकून भागून , आल्यानंतर , स्वस्थ मनाने जेवल्यास , आपण कसे ताजेतवाने होतो . साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते .
अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त ...
तुम्ही पण करून पहा , आता कृती पाहू ....

अंबाडी भाजी

#RJR
दिवसभर कामं धामं करून ,थकून भागून , आल्यानंतर , स्वस्थ मनाने जेवल्यास , आपण कसे ताजेतवाने होतो . साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते .
अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त ...
तुम्ही पण करून पहा , आता कृती पाहू ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटं
3 व्यक्ती
  1. 1जुडी अंबाडी भाजी
  2. 1/2जुडी मेथी भाजी
  3. दीड टेबलस्पून तूर डाळ
  4. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 5-6हिरव्या मिरच्या
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 1,टीस्पून जिरे
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  10. चवीपुरते मीठ
  11. 8-10पानें कढीपत्ता
  12. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  13. फोडणीस तेल

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटं
  1. 1

    दोन्ही भाज्या स्वच्छ धुऊन निवडून घ्या. पॅनमध्ये 4 -5 कप पाणी घेऊन, त्यांत शेंगदाणे व दोन्ही भाज्या टाकून, छान वाफवून घ्या. तूर डाळ कुकरमध्ये ठेवून त्याला तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या.

  2. 2

    वाफलेल्या भाज्यांचे पाणी वेळुन काढा, म्हणजे अंबाडीचा आंबटपणा कमी होईल.
    एका भांड्यात भाज्या व शिजलेली तूर डाळ टाकून त्यांत चवीपुरते मीठ, हळद टाका.रवीने किंवा ब्लेंडर ने फिरवून भाजी घोटून घ्या.

    हिरव्या मिरच्या जिरे व लसूण मिक्सरला फिरवून त्याचे वाटण तयार करा.

  3. 3

    कढईत तेलाची फोडणी करून, त्यांत मोहरी - जिरे टाकून तडतडू द्या. फोडणीत हिरव्या मिरचीचे वाटण टाकून, हळद टाका. ते छान परतल्यावर, त्यांत घोटलेली अंबाड्याची भाजी टाकून, छान उकळू द्या.- झक्कास पैकी अंबाडी भाजी तयार !!
    ही भाजी गरम गरम भाकरी बरोबर किंवा शिळ्या भाकरी बरोबर सुद्धा अगदी भन्नाट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes