भाज्यांचे आंबट - गोड लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट ....

हिवाळ्यात ताज्या भाज्यांची भरपूर रेलचेल असते . नेहमीच कांहीं तरी नवीन करून पाहायची इच्छा असते . त्यामुळे या वेळी मिक्स भाज्यांचे खमंग , आंबट - गोड लोणचे केले .
तुम्ही करुन पहा . आता कृति पाहू ....

भाज्यांचे आंबट - गोड लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

#EB11 #W11 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट ....

हिवाळ्यात ताज्या भाज्यांची भरपूर रेलचेल असते . नेहमीच कांहीं तरी नवीन करून पाहायची इच्छा असते . त्यामुळे या वेळी मिक्स भाज्यांचे खमंग , आंबट - गोड लोणचे केले .
तुम्ही करुन पहा . आता कृति पाहू ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
5 - 6 सर्व्हिंगस
  1. 1 टीस्पूनश्रावणी घेवडा निवडलेला
  2. 1 टीस्पूनगवार चिरलेली
  3. 1 टीस्पूनगाजर तुकडा
  4. 1 टीस्पूनमटार
  5. 7-8हिरवी मिरची
  6. 2 ते 3आलं
  7. 10-12लसूण पाकळ्या
  8. 1 लिंबू
  9. दीड टेबलस्पून लिंबूरस
  10. 2 टेबलस्पूनगूळ किसलेला
  11. 2 टेबलस्पूनमोहरीची डाळ
  12. 2/5 टीस्पूनलाल तिखट
  13. 1/4हळद
  14. 1 टीस्पूनमेथ्या
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. चवीपुरते मीठ
  17. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    आधी सर्व भाज्या स्वच्छ धुवून कोरडे होऊ द्या.
    त्यानंतर भाज्यांचे सूरीने,मध्यम आकाराचे उभे तुकडे करा. लिंबाच्या लहान पातळ चकत्या करा.आल्याचे पण पातळ तुकडे करा. लसूण पाकळ्या सोलून ठेवा.
    लिंबाचा रस काढून बाजूला ठेवा. गूळ किसून घ्या.
    लहान कढई मध्ये तेलाची फोडणी करा. तेल छान तापल्यानंतर, गॅसची फ्लेम बंद करा व त्यात हिंग पूड व हळद टाकून खमंग फिडणी करा. फोडणी गार करण्यास ठेवा.

  2. 2

    चिरलेल्या सर्व भाज्या एका काचेच्या बाऊलमध्ये घ्या. त्यावर लाल तिखट, मोहरीची डाळ,मीठ, लिंबाचा रस, गूळ घालून, मिश्रण छान मिक्स करा.लिंबाचा रस व गुळामुळे, 10 -15 मिनिटांत त्याला पाणी सुटेल.
    गार झालेली फ़ोडणी लोणच्यावर ओता व चांगले मिक्स करा. खराब होऊ नये म्हणून, फ्रीजमध्ये ठेवा.

  3. 3

    7 - 8 दिवसांत लोणचे छान मुरेल. मस्त अशा आंबट गोड लोणच्याचा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes