#भाजणीचे थालिपीठ

Savita Totare Metrewar @cook_31530402
कुकिंग सूचना
- 1
१वाटी भाजणी पीठ घ्या,त्यात तिखट, मीठ हळद कोथिंबीर लसूण पेस्ट,तीळ धने पूड,जिरे पूड घालून गरम पाण्याने पीठ मळून घ्या.१० मिनिटे झाकून ठेवा.
- 2
नंतर थालीपीठ पिठात घोळवून लाटुन घ्या व खरपूस भाजा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipith recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रथालिपीठ हा महाराष्ट्रातील एक खमंग व झटपट होणारा पदार्थ,तसेच अमराठी खवय्यांचा यादीत अग्रेसर क्रमांकावर असणारा पदार्थ.महाराष्ट्रात थालिपीठ भाजणी व थालिपीठ वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. Kalpana D.Chavan -
भाजणीचे कांद्याचे थालिपीठ (bhajniche kandhyache thalipeeth recipe in marathi)
#wdभाजणीचे कांद्याचे थालिपीठ हि रेसिपी मी माझ्या आजीला डेडीकेट करते. कांद्याचे थालिपीठ म्हटले की मला माझ्या आजीची आठवण येते.माझी आजी खुप छान खुसखुशित खमंग भाजणीचे थालिपीठ करायची.मी माहेरी गेले की मला आठवणीने हे सगळं द्यायची.आज माझी आजी नाही पण तीने शिकवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीजचा वारसा आहे,आणि म्हणुनच मी माझी रेसिपी माझ्या आजीला डेडीकेट करते. Supriya Thengadi -
-
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLRदिवाळीत आपण चकली भाजणी बनवतो हिच भाजणी जास्त बनवून त्याची थालीपीठ बनवता येतात दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला यास पिठाची थालिपीठ बनवता येते चला तर मग बनवूयात भाजणीचे थालीपीठ अगदी झटपट आणि कमी वेळात पौष्टिक अस थालीपीठ आपणास शक्ती देणारा आहे Supriya Devkar -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्र्चिम #महाराष्ट्रपश्र्चिम महाराष्ट्र भागात जवळपास घरोघरी केले जाणारे खमंग खुसखुशीत भाजणीचे थालिपीठ प्रसिद्ध आहे. हे खायला पौष्टिक आणि हलके असते. नाश्ता किंवा जेवणासाठी केला जाणारा आवडीचा पदार्थ आहे. यामधे वेगवेगळी धान्य भाजून त्यात थोडाच मसाला आणि कांदा मिरची, लसून घालून करतात. जर भाजणीचे पीठ नसेल तर घरी उपलब्ध असलेली दोन, तीन पिठं सुकीच भाजून पण त्याचे थालीपीठ बनवलं तर छानच खमंग लागतं. बाजारात पण तयार भाजणीचे थालीपीठाचे पीठ मिळतं.महाराष्ट्रातील घरांमधे कधी जर कोणी घरी भुकेने आला तर त्याला पटकन थालीपीठ करुन देण्यासाठी आजी, आई, काकी, मामी अग्रेसर असतात. गरमागरम खमंग खुसखुशीत दोन थालीपीठं जरी खाल्ली तरी मस्त पोट आणि मन तृप्त होतं. थालीपीठा बरोबर लोण्याचा गोळा असेल तर पर्वणीच असते. Ujwala Rangnekar -
भाजणीचे खमंग थालिपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढातला पाऊस ,हिरवागार निसर्ग,मन प्रसन्न करणारे वातावरण ,अश्यावेळी छान छान पदार्थ करावेसे वाटतात,आज माझ्याकडे भाजणी तयार आहे मग खमंग पौष्टिक अशी थालिपीठ करणार आहे, Pallavi Musale -
मेथी भाजणीचे थालीपीठ
#GA4#week19#methiथालीपीठ नुसतं चवीनं श्रीमंत नाही, तर ते पौष्टिकही आहे. त्यातल्या धान्यांमधून, कार्बोहायड्रेट मिळतात.सोबत प्रथिनांनी समृद्ध असलेली कडधान्ये आहेतच. शिवाय भाजून घेतल्याने पचायला हलके.थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ आणि मेथी थालीपिठात घातली तर त्यामुळे लोह, फायबर्स, व्हिटामिन्स यांची हवी तेवढी रेलचेल पदार्थात उतरते. अशा बहुगुणी थालिपीठाची रेसिपी चला तर मग बघुया 👍 Vandana Shelar -
-
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र पुणे सांगली सातारा कोल्हापुर कुठेही जा प्रत्येक घरात नेहमी नाष्ट्याला होणारा पौष्टीक व पोटभरीचा पदार्थ म्हणजे भाजणीचे थालिपीठ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धान्य कडधान्य त्याचे प्रमाण वेगवेगळे असते चला तर आज मि बनवलेल्या भाजणी पिठाचे थालिपीठ कशी बनवली ते सांगते Chhaya Paradhi -
भाजणीचे कांद्याचे थालिपीठ (bhajniche kandhyache thalipeeth recipe in marathi)
#ashr देवशयनीआषाढी एकादशीचा उपास करण्याआधी आषाढात कांदेनवमी साजरी केली जाते.हं...पण ही कांदेनवमी तुम्हाला कोणत्याही कँलेंडरवर लिहीलेली दिसणार नाही..आणि कांदेनवमी हे पण कोणीतरी शोधून काढलेलं🤣😃तरीही घराघरात पूर्वापार ही कांदेनवमी साजरी करणे म्हणजे एक सोहळाच असतो.कांदा भजी,कांद्याचे थालिपीठ, कांद्याची पात पीठ पेरलेली असे किती म्हणून पदार्थ!कांद्याला आपल्या खाद्य संस्कृती मध्ये किती मोठे स्थान आहे!कांदा थंड व तिखट गुणाचा आहे,त्याचे कितीतरी औषधी उपयोग शरिरासाठी आहेत.असा हा कांदा तामस आहारात समाविष्ट होतो.आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो.त्यामुळे इथून पुढे चार महिने असा कांदा,लसूणयुक्त तामस आहार वर्ज्यच!चार महिने कांदा,लसूण,वांगी न खाणारे माझे माहेर होते.हल्ली आता कांद्याशिवाय पानच हलत नाही.या चार महिन्यात पाऊसही कधी रिपरिप तर कधी रिमझिम असा सुरु असतो.प्रकृती स्वास्थ्यासाठीवातप्रकोप होऊ नये म्हणूनही कांदा या काळात खाऊ नये.चातुर्मास हा व्रतवैकल्याचा,पवित्र आणि सणासमारंभांची रेलचेल असल्याने त्यावेळी इथे कांद्याला स्थान नाही.सगळे सात्त्विक भाव आपल्यामध्ये उतरावेत,देहाने शुद्ध भाव आचरावा,राजस आणि तामस गुणांचा निचरा व्हावा यासाठी आपल्या पूर्वजांनी ही आहार रचना केली आहे.प्रत्येक ऋतुमधील सणवार आणिआहार यांची ऋषीमुनींनी सांगड घालून ठेवली आहे.त्याचा आरोग्याशीही संबंध आहेच!!पेश आहे आषाढातील रेसिपी निमित्त "भाजणीचं कांद्याचं थालिपीठ " Sushama Y. Kulkarni -
श्रावण मंगळागौर स्पेशल भाजणीचे वडे (bhajni vade recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ चॅलेंज#week3श्रावण महिन्यात अनेक सण येतातधरती हिरव्या पाना फुलांनी बहरते 🌿🌺🌸☘️ श्रावण महिन्यात तर अनेक विविध पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. ... नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येतेतसेच पारंपरिक खेळ खेळण्यात येतात हळदी कुंकू करण्यात येतेमंगळागौरीला पूरणा वरणा चा स्वयंपाक तर असतो पण त्याबरोबर तिखट चमचमीत भाजणी चे वडे करतात हे वडे अत्यंत चवदार व रुचकर असे लागतात 😋👌विशेष म्हणजे हि भाजणी कडधान्ये भाजून त्याचे पिठ तयार करतात म्हणून हे वडे अत्यंत पौष्टिक होतातचला तर बघुया कसे करायचे भाजणीचे वडे. Sapna Sawaji -
-
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5घरीच केलेली खमंग भाजणी तेही सगळे सालीसकट कडधान्य व ज्वारी बाजरी गहू नाचणी असे तब्बल 16 जिन्नस असलेली पौष्टिक व त्यात कांदे पात व कांदा घालून केलेल रुचकर थालिपीठ त्यासोबत लोणी व लोणचं दही चटणी म्हणजे पर्वणीच Charusheela Prabhu -
काकडीचे थालिपीठ (kakdiche thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप#फोटोग्राफीक्लासआज फोटोग्राफी क्लासचा होम वर्क म्हणून मी माया बवाने दमाई यांची काकडी थालीपीठ रेसिपी कूक स्नॅप केली आहे, पण त्यात मी थोडा बदल करून नेहमीची खमंग थालीपीठ भाजणी ( अर्थातच हविकाची) वापरली आहे खूपच चविष्ट झाले.Pradnya Purandare
-
कांदापातीचे खुसखुशीत थालिपीठ (kanada patiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#थालिपीठ -वेगवेगळ्या भाज्या घालून थालिपीठ करता येते. पोटभरीचा पौष्टिक आणि हेवी नाष्टा... Manisha Shete - Vispute -
ज्वारीचे खमंग थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#ज्वारीचे_खमंग_थालिपीठ..😋देखा एक ख्वाब....😍 थालीपीठ हे मराठी खाद्यपरंपरेला पडलेलं खमंग खरपूस स्वप्न !!!! या वाक्यात मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये..😊कारण जेव्हां हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजणीचा डबा नुसता जरी उघडला तरी खमंग दरवळ चोहीकडे पसरतो..आणि मग सुरु होतो हा खमंग वासाने वेड लावणारा स्वप्नपूर्तीचा प्रवास...😋 परातीमध्ये भाजणी घेतल्यावर त्यात थालिपीठाचा स्वाद सातवे आसमान पर पहुंचानेवाला त्याचा जानी दोस्त कांदा तर हवाच..तसा नियमच असतो तो..😜 अगदी Hit जोडगोळी आहे ही..अगदी अमिताभ-रेखा सारखी..आणि नंतर तुम्ही तुम्हांला हव्या त्या भाज्या,मसाले add केले की हमखास जिभेवर रेंगाळणारी चव तुमच्यासमोर हजर..😋आणि रेंगाळणार्या या चवीचा आस्वाद घेण्याचा सिलसिला आजन्म सुरुच राहतो...😀 दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या ‘खमंग’मध्ये थालीपिठाला पहिलं स्थान दिलंय. त्या म्हणतात, ‘दौपदीला जी थाळी मिळाली होती, तिच्यावरून ‘स्थाली पाक’ हा शब्द आला. थाळीत काहीही शिजवता येतं. ही तव्याच्या पूर्वीची, खोल मातीची किंवा धातूची असे. या थाळीत थालीपिठं, पिठलं, भात व भाकरीही होत. थालीपीठ म्हणजे थालीत शिजवलेला पिठाचा पदार्थ’... चला तर मग या खमंग स्वप्नपूर्तीचा प्रवास करु या... Bhagyashree Lele -
उपवासाचे भाजणीचे थालिपीठ (upwasache bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5उपवासाला भाजणीचे थालिपीठ अगदी पुरेसे होते.खरं तर मला सगळ्याच प्रकारच्या भाजण्या करायला खूपच आवडतात.त्यामुळे मी या भाजण्या कधीच विकत आणत नाही.पूर्वी प्रमाण माहिती नव्हते,त्यावेळी "रुचिरा"मधील पाककृती प्रमाणे करायचे.पण करताना जसजशा अडचणी येऊ लागल्या तसतशी माझ्या करण्यात मी सुधारणा करत गेले..तसेच काहीवेळा प्रमाणातही चुका व्हायच्या,तर कधी भाजताना.कधी कुणा सुगरणीला विचारले तरी बऱ्याचदा नीट माहिती सांगत नसत.शेवटी माझे मीच प्रमाण सेट केले आणि आता खूपच छान अशा भाजण्या होऊ लागल्या.मध्यंतरी मी या भाजण्या ऑर्डरप्रमाणे करुनही देत असे.त्यामुळे पँकिग,मार्केटिंग हे सुद्धा शिकायला मिळाले.भाजण्यांप्रमाणेच चकलीची भाजणी जमणे हे सुद्धा कौशल्याचे काम आहे.कारण चकलीचा कुरकुरीतपणा आणि खमंग चव दोन्हीही साधता यायला हवे!उपासाचे थालिपीठ हे खमंगच हवे.त्यात घातल्या जाणाऱ्या जीऱ्यांचा सुवास टिकायला हवा.त्यासाठी खूप निवांत वेळ कोणत्याही भाजणीसाठी द्यावा लागतो.घरघंटीवर अगदी भेसळमुक्त पीठं घरगुती तत्वावर बनवू शकतो.अगदी हवं तेव्हा...मला तर वाटतं ती काळाची गरज आहे.चला तर करुन पाहू या....उपवासाचे खमंग थालिपीठ😋😋 Sushama Y. Kulkarni -
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
-
भाजणीची चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #फराळ४ दिवाळीतिल पदार्थांमधे सगळ्यात आवडिचा पदार्थ चकली. Janhvi Pathak Pande -
काकडीचे धपाटे/थालिपीठ (kakdiche dapate recipe in marathi)
#KS3 # काकड्या यायला लागल्या की संध्याकाळच्या वेळेस हे गरमागरम धपाटे करणे आणि खाऊ घालने हे ठरलेलेच... पूर्वी प्रत्येक फळाचा, भाजीचा एक सीजन राहायचा. त्यामुळे ज्या हे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायचे, त्यावेळेस त्याचे विविध प्रकार करून खाण्यामध्ये यायचेl. साधारणता, पोळ्याच्या आगेमागे काकड्या यायच्या ..घरी आणलेल्या काकड्यापैकी, एखादी काकडी जरड निघाली की त्याची हमखास थालिपीठ किंवा व्हायचे.. विदर्भात काही ठिकाणी अजूनही अशी परंपरा आहे की पाठीवर जर भाऊ झाला असेल, तर बहीण पोळ्या पर्यंत काकडी खात नाही. पोळ्याच्या दिवशी भावाच्या पाठीवर काकडी फोडून मग ती खाते.. आम्ही लहानपणी असंच करायचं.. माझी आई अजूनही ही परंपरा पाळते.. ती पाठीवर तर काकडी फोडत नाही, मग उंबरठ्यावर फोडते. मग त्या काकडीचा प्रसाद वाटल्या जातो.. पण ती पोळ्या पर्यंत काकडी खात नाही.. असे हे काकडी पुराण..तेंव्हा विदर्भात घरोघरी होणारे हे काकडीचे धपाटे,. नाव वेगवेगळे असेल कदाचित... Varsha Ingole Bele -
दही पराठा (dahi paratha recipe in marathi)
#GA4 #week1Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले आहे. आणि मी आज करणार आहे दही परोटा.. मस्त मऊ हे पराठे होतात. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
-
-
भाजणीचे डाएट थालीपीठ (bhajniche diet thalipeeth recipe in marathi)
भाजणीचे थालीपीठ हा महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल पदार्थ! घरोघरी अगदी आवडीने आणि चवीने लोणी, दही, ताक आणि चटणी यासोबत खाल्ला जातो. माझ्या विद्या मावशीच्या हातचे थालीपीठ म्हणजे तर माझी हक्काची मेजवानीच! थालीपीठ म्हटलं की डाएटला मुरड घालावी लागते ना !तर मग आज आपण बघू या डाएट फ्रेंडली थालीपीठ कसे बनवता येईल ते. Pragati Pathak -
-
-
सेसमी कॅबेज लसूणी पराठा
#पराठाआता सगळीकडे लाॅकडाऊन सुरु आहे. प्रत्येक जणं आपापल्या घरात बंद असले तरी सुरक्षित आहेत. घरी रहाणंच सर्वांच्या हिताचे आहे. घरात जे उपलब्ध खाण्याचे सामान असेल, तेच पुरवून आणि पुढील दिवसांसाठी उरवायचे पण आहे. अशा वेळी कमीतकमी साहित्यामधे पौष्टिक पदार्थ करण्याकडे गृहिणींचा कल वाढला आहे. मी पण असाच विचार करत घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून पौष्टिक असा पराठा बनवला आणि टोमॅटो चटणी पण बनवली आहे. त्याचे साहित्य आणि कृती पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm6#रेसिपी मॅगझीन#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठउपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16901991
टिप्पण्या