भाजणीचे डाएट थालीपीठ (bhajniche diet thalipeeth recipe in marathi)

Pragati Pathak
Pragati Pathak @TumhariSulu

भाजणीचे थालीपीठ हा महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल पदार्थ! घरोघरी अगदी आवडीने आणि चवीने लोणी, दही, ताक आणि चटणी यासोबत खाल्ला जातो. माझ्या विद्या मावशीच्या हातचे थालीपीठ म्हणजे तर माझी हक्काची मेजवानीच! थालीपीठ म्हटलं की डाएटला मुरड घालावी लागते ना !
तर मग आज आपण बघू या डाएट फ्रेंडली थालीपीठ कसे बनवता येईल ते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमभाजणी
  2. पाणी मळताना लागेल तसे
  3. 2मध्यम आकाराचे कांदे
  4. मीठ चवीनुसार
  5. 1/2 चमचाधने-जीरे -ओवा पूड
  6. 100 ग्रॅमअमूल बटर किंवा घरचे लोणी
  7. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    भाजणीच्या थालीपीठासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे भाजणी! तर इथे मी नेहमीची भाजणी न घेता मल्टिग्रेन भाजणी घेतली आहे. भाजणी घरी बनवणे शक्य नसेल तर बाजारात Rustik Paushtiq यांची मल्टिग्रेन भाजणी तुम्हाला सहज मिळेल. Amazon वर सुद्धा ही सहज उपलब्ध आहे.
    https://www.amazon.in/dp/B0881R6P7F/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_X0N4C45F15A83XPT90EY

  2. 2

    प्रथम २५० ग्रॅम भाजणीमध्ये दोन बारीक चिरलेले कांदे, अर्धी वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा धणे-जीरे -ओवा पूड आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे.

  3. 3

    आता या मिश्रणामध्ये गरजेनुसार दही किंवा घरचे ताक घालून गोळा सैलसर मळून घ्यावा. मळताना कुठेही तेलाचा वापर करू नये. तयार झालेला गोळा दहा मिनिटे भिजू द्यावा.

  4. 4

    आता लोखंडी तव्यावर १ चमचा तूप किंवा लोणी घालावे आणि पहिले थालीपीठ तव्यावरच थापायला घ्यावे. थालीपीठ अगदी पातळ थापावे. आणि खुसखुशीत भाजण्यासाठी त्याला बोटाने तीन किंवा चार भोके करावीत.
    असे हे थालीपीठ तव्यावर मंद आचेवर खुसखुशीत भाजून घ्यावे.
    दुसरे थालीपीठ पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवून त्यावर थापावे म्हणजे हात भाजणार नाही.
    आणि प्लास्टीक पेपर वरून थालीपीठ तव्यावर अलगद सुटावे म्हणून गोळा थापण्याआधी पेपरला थोडे तूप लावून घ्यावे.

  5. 5

    आता आपल्या या थालीपीठावर लोण्याचा गोळा घालून सर्व्ह करण्यास हे तयार आहे.
    मस्त दही किंवा ताक आणि शेंगांच्या चटणीबरोबर हे फस्त करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Pathak
Pragati Pathak @TumhariSulu
रोजी

Similar Recipes