भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजणी पिठात सगळे जिन्नस घालावे, मिक्स करून घ्या, व थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे. भिजवून गोळा तयार
- 2
तयार गोळ्या चे समान भाग करून घ्या हाताने थापून घ्या, व मध्ये छिद्र करून घ्यावे. तव्यावर तेल लावून तापवत ठेवा व थालिपीठ त्यावर टाका, व खालीची बाजू सोनेरी होई पर्यंत खरपूस भाजून घ्यावे
- 3
वरच्या बाजूने तेल लावून घ्या, व त्या छिद्रात पण तेल घाला, नंतर उलटून घ्यावे व दुसरी बाजू पण खमंग खरपूस भाजून घ्या
- 4
दही, लोणचं, बरोबर सर्व्ह करा, व थालिपीठ ला वरून तूप लावून गरम गरम अस्वाद घ्यावा
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाजणीचे खमंग थालिपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#ashrआषाढातला पाऊस ,हिरवागार निसर्ग,मन प्रसन्न करणारे वातावरण ,अश्यावेळी छान छान पदार्थ करावेसे वाटतात,आज माझ्याकडे भाजणी तयार आहे मग खमंग पौष्टिक अशी थालिपीठ करणार आहे, Pallavi Musale -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipith recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रथालिपीठ हा महाराष्ट्रातील एक खमंग व झटपट होणारा पदार्थ,तसेच अमराठी खवय्यांचा यादीत अग्रेसर क्रमांकावर असणारा पदार्थ.महाराष्ट्रात थालिपीठ भाजणी व थालिपीठ वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. Kalpana D.Chavan -
उपवास भाजणी चे थालीपीठ (Upvas Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#थालीपीठ#भाजणी Sampada Shrungarpure -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र पुणे सांगली सातारा कोल्हापुर कुठेही जा प्रत्येक घरात नेहमी नाष्ट्याला होणारा पौष्टीक व पोटभरीचा पदार्थ म्हणजे भाजणीचे थालिपीठ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धान्य कडधान्य त्याचे प्रमाण वेगवेगळे असते चला तर आज मि बनवलेल्या भाजणी पिठाचे थालिपीठ कशी बनवली ते सांगते Chhaya Paradhi -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLRदिवाळीत आपण चकली भाजणी बनवतो हिच भाजणी जास्त बनवून त्याची थालीपीठ बनवता येतात दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला यास पिठाची थालिपीठ बनवता येते चला तर मग बनवूयात भाजणीचे थालीपीठ अगदी झटपट आणि कमी वेळात पौष्टिक अस थालीपीठ आपणास शक्ती देणारा आहे Supriya Devkar -
थालिपीठ(thalipeeth recipe in marathi)
#झटपट रेसिपीथालिपीठ - थालिपीठ म्हटले की 'भाजणी' पण विना भाजणी पण थालिपीठ खूप छान बनतेतर चलातर मग बघूया झटपट बनणारे विना भाजणी थालिपीठ फक्त तीन पिठाचे पासून. Suvarna Potdar -
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#cpm5थालिपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालिपीठ , शिंगाड्याचे थालिपीठ, साबुदाण्याचे थालिपीठ, तांदळाचे थालिपीठ, काकडीचे थालिपीठ , गव्हाचे थालिपीठ सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालिपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालिपीठ बनवता येते. असा हा थालिपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.सर्व धान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालिपीठ करावे. पौष्टीक लागते. Yadnya Desai -
भाजणीचे कांद्याचे थालिपीठ (bhajniche kandhyache thalipeeth recipe in marathi)
#wdभाजणीचे कांद्याचे थालिपीठ हि रेसिपी मी माझ्या आजीला डेडीकेट करते. कांद्याचे थालिपीठ म्हटले की मला माझ्या आजीची आठवण येते.माझी आजी खुप छान खुसखुशित खमंग भाजणीचे थालिपीठ करायची.मी माहेरी गेले की मला आठवणीने हे सगळं द्यायची.आज माझी आजी नाही पण तीने शिकवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीजचा वारसा आहे,आणि म्हणुनच मी माझी रेसिपी माझ्या आजीला डेडीकेट करते. Supriya Thengadi -
-
भाजणीचे थालीपीठ (bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5घरीच केलेली खमंग भाजणी तेही सगळे सालीसकट कडधान्य व ज्वारी बाजरी गहू नाचणी असे तब्बल 16 जिन्नस असलेली पौष्टिक व त्यात कांदे पात व कांदा घालून केलेल रुचकर थालिपीठ त्यासोबत लोणी व लोणचं दही चटणी म्हणजे पर्वणीच Charusheela Prabhu -
उपवासाचे भाजणीचे थालिपीठ (upwasache bhajniche thalipeeth recipe in marathi)
#cpm5उपवासाला भाजणीचे थालिपीठ अगदी पुरेसे होते.खरं तर मला सगळ्याच प्रकारच्या भाजण्या करायला खूपच आवडतात.त्यामुळे मी या भाजण्या कधीच विकत आणत नाही.पूर्वी प्रमाण माहिती नव्हते,त्यावेळी "रुचिरा"मधील पाककृती प्रमाणे करायचे.पण करताना जसजशा अडचणी येऊ लागल्या तसतशी माझ्या करण्यात मी सुधारणा करत गेले..तसेच काहीवेळा प्रमाणातही चुका व्हायच्या,तर कधी भाजताना.कधी कुणा सुगरणीला विचारले तरी बऱ्याचदा नीट माहिती सांगत नसत.शेवटी माझे मीच प्रमाण सेट केले आणि आता खूपच छान अशा भाजण्या होऊ लागल्या.मध्यंतरी मी या भाजण्या ऑर्डरप्रमाणे करुनही देत असे.त्यामुळे पँकिग,मार्केटिंग हे सुद्धा शिकायला मिळाले.भाजण्यांप्रमाणेच चकलीची भाजणी जमणे हे सुद्धा कौशल्याचे काम आहे.कारण चकलीचा कुरकुरीतपणा आणि खमंग चव दोन्हीही साधता यायला हवे!उपासाचे थालिपीठ हे खमंगच हवे.त्यात घातल्या जाणाऱ्या जीऱ्यांचा सुवास टिकायला हवा.त्यासाठी खूप निवांत वेळ कोणत्याही भाजणीसाठी द्यावा लागतो.घरघंटीवर अगदी भेसळमुक्त पीठं घरगुती तत्वावर बनवू शकतो.अगदी हवं तेव्हा...मला तर वाटतं ती काळाची गरज आहे.चला तर करुन पाहू या....उपवासाचे खमंग थालिपीठ😋😋 Sushama Y. Kulkarni -
कांदापातीचे खुसखुशीत थालिपीठ (kanada patiche thalipeeth recipe in marathi)
#cpm5#थालिपीठ -वेगवेगळ्या भाज्या घालून थालिपीठ करता येते. पोटभरीचा पौष्टिक आणि हेवी नाष्टा... Manisha Shete - Vispute -
-
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळ्यातील पौष्टिक,चटकदार गरम गरम थालिपीठ म्हणजे स्वर्ग सुख. बाहेर धुवाधार पाऊस आणि खायला गरम थालिपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा आहा हा. आज मी केलं आहे थालिपीठ. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की करून पाहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#HLR # हेल्थी रेसिपी चॅलेंज सकाळचा हेल्दी नाष्टा त्यासाठी भाजणीचे थालिपीठ हा पोटभरीचा प्रकार नेहमीच घरोघरी केला जातो भाजणी साठी वापरलेल्या सर्व डाळी , तांदुळ, धने जीरे , पोहे, साबुदाणे हे सर्व घटक शरीराला फायदेशीर आहेत चला तर सगळ्यांच्या आवडीचे भाजणीचे थालिपिठ कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
-
कोबीचे थालिपीठ (kobiche thalipeeth recipe in marathi)
#cpm4आज असे वाटले डब्यात कोबीचे थालिपीठ देऊ या.पटकन होणारे,रुचकर थालिपीठ आज मी केले. Pallavi Musale -
भाजणीचे कांद्याचे थालिपीठ (bhajniche kandhyache thalipeeth recipe in marathi)
#ashr देवशयनीआषाढी एकादशीचा उपास करण्याआधी आषाढात कांदेनवमी साजरी केली जाते.हं...पण ही कांदेनवमी तुम्हाला कोणत्याही कँलेंडरवर लिहीलेली दिसणार नाही..आणि कांदेनवमी हे पण कोणीतरी शोधून काढलेलं🤣😃तरीही घराघरात पूर्वापार ही कांदेनवमी साजरी करणे म्हणजे एक सोहळाच असतो.कांदा भजी,कांद्याचे थालिपीठ, कांद्याची पात पीठ पेरलेली असे किती म्हणून पदार्थ!कांद्याला आपल्या खाद्य संस्कृती मध्ये किती मोठे स्थान आहे!कांदा थंड व तिखट गुणाचा आहे,त्याचे कितीतरी औषधी उपयोग शरिरासाठी आहेत.असा हा कांदा तामस आहारात समाविष्ट होतो.आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो.त्यामुळे इथून पुढे चार महिने असा कांदा,लसूणयुक्त तामस आहार वर्ज्यच!चार महिने कांदा,लसूण,वांगी न खाणारे माझे माहेर होते.हल्ली आता कांद्याशिवाय पानच हलत नाही.या चार महिन्यात पाऊसही कधी रिपरिप तर कधी रिमझिम असा सुरु असतो.प्रकृती स्वास्थ्यासाठीवातप्रकोप होऊ नये म्हणूनही कांदा या काळात खाऊ नये.चातुर्मास हा व्रतवैकल्याचा,पवित्र आणि सणासमारंभांची रेलचेल असल्याने त्यावेळी इथे कांद्याला स्थान नाही.सगळे सात्त्विक भाव आपल्यामध्ये उतरावेत,देहाने शुद्ध भाव आचरावा,राजस आणि तामस गुणांचा निचरा व्हावा यासाठी आपल्या पूर्वजांनी ही आहार रचना केली आहे.प्रत्येक ऋतुमधील सणवार आणिआहार यांची ऋषीमुनींनी सांगड घालून ठेवली आहे.त्याचा आरोग्याशीही संबंध आहेच!!पेश आहे आषाढातील रेसिपी निमित्त "भाजणीचं कांद्याचं थालिपीठ " Sushama Y. Kulkarni -
-
मराठवाडा स्पेशल ज्वारीचे थालिपीठ (jowariche thalipeeth recipe in marathi)
#KS5थालीपीठ हा असा खाद्य पदार्थ आहे जो आपण नाश्त्याला, जेवणात किंवा लांबचा प्रवास करताना देखील सोबत खाण्याकरीता ठेवू शकतो. थालीपिठ ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी असूनही महाराष्ट्रातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता मराठवाडा पद्धतीची ज्वारीच्या थालिपीठाची रेसिपी घेऊन आले आहे.थालिपीठ म्हणलं की भाजणीचं हेच डोळ्यापुढे येतं.त्याची सर कशालाच नाही.खूप अनुभवी हातांनी योग्य प्रमाणात आणि अचूक अशी भाजलेली भरपूर धणे भाजून घातलेली भाजणी...त्याचे थालिपीठ...मस्त भरपूर कांदा-कोथिंबीर... सोबत लोण्याचा गोळा....ताजे नवे घातलेले कैरीचे लोणचे किंवा लिंबाचे मुरलेले...आणि तव्यावरुन पानात आले की जे स्वर्गसुख मिळते ते कश्शातच नाही.स्वयंपाकाच्या कंटाळ्याला चोख पर्याय थालिपीठच..वेळ आणि भूक दोन्ही भागवणारा.ही भाजणी म्हणजे पंचधान्य,सप्तधान्य घालून केलेली.आपली दररोजच्या वापरातील सगळी धान्ये यात येतातच.जास्त प्रमाण ज्वारी बाजरीचे,त्याहून कमी गहू,तांदूळ,हरभराडाळ,उडीदडाळ, मूगडाळ इ.इ.डाळींऐवजी ती कडधान्ये घेतल्यास अधिकच पौष्टिक. कधी नाचणी,वरई,चवळी,सोयाबीनही घालतात.गुजराथकडे ही धान्य न भाजताच फक्त एकत्र करुन दळून थालिपीठ करतात.कोकणात तांदळाची कांदा घालून केलेली थालिपीठं मस्तच लागतात.भाजणी करेपर्यंत मात्र ज्वारीची थालिपीठेही आनंद देतात...कधी कोबी,कधी गाजर असे घालून.भरपूर प्रोटीन्स आणि कार्ब्ज चा स्त्रोत आपल्या पूर्वजांनी थालिपीठ रुपाने दिलाय आणि घरोघरी ती आवर्जुन केली जातातच!माझी एक काकू आहे अप्रतिम भाजणी करते...ती साधी थालिपीठाची किंवा चकलीची किंवा उपासाची असो....तिच्या हातची ही चव कुठेच नाही.ही मराठवाड्याकडची थालिपीठं तुम्हालाही आवडतील अशीच!!😊 Sushama Y. Kulkarni -
-
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 थालिपीठ हा महाराष्ट्रियन नाश्त्याचा प्रकार असला तरी सर्व जण आवडीने खातात. थंड पावसाचे दिवसात तर ह्या पोष्टिक नाश्ता तर हवाच Deepali Amin -
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेषआज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week16#Jowar (ज्वारी)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे Jowar म्हणजे ज्वारी.आज थालीपीठ केले आहे. एक वेगळाच ट्राय, पण लागत होते चमचमीत. लहान मुलं ते वयोवृद्ध पर्यंत खाऊ शकतात, पचायला पण हलके. यात वातूळ असे काहीच नाही.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत,Biryani, Orissa, Brownie, Spinach soup, Peri peri, Jowar Sampada Shrungarpure -
काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ (kakdichi thalipeeth recipe in marathi)
मी पूजा व्यास मॅडम ची काकडीचे बहुधान्ययुक्त थालिपीठ ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट, एकदम पौष्टिक.सगळ्यांना खूपच आवडली थालिपीठ. Preeti V. Salvi -
-
उपवास भाजणी थालिपीठ
#goldenapron3 #11thweek vrat ह्या की वर्ड साठी उपवास भाजणी थालिपीठ केले आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या घरी उपवासाला चालेलच असं नाही त्यामुळे आवश्यकतेनुसार आपण त्यात बदल करू शकतो.उदा. कोथिंबीर,लाल तिखट ह्या गोष्टी चालत नसल्यास त्या टाकू नयेत ,त्याऐवजी आपल्याकडे उपवासाला चालतील त्या गोष्टी त्यात घालाव्यात. Preeti V. Salvi -
भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)
#पश्र्चिम #महाराष्ट्रपश्र्चिम महाराष्ट्र भागात जवळपास घरोघरी केले जाणारे खमंग खुसखुशीत भाजणीचे थालिपीठ प्रसिद्ध आहे. हे खायला पौष्टिक आणि हलके असते. नाश्ता किंवा जेवणासाठी केला जाणारा आवडीचा पदार्थ आहे. यामधे वेगवेगळी धान्य भाजून त्यात थोडाच मसाला आणि कांदा मिरची, लसून घालून करतात. जर भाजणीचे पीठ नसेल तर घरी उपलब्ध असलेली दोन, तीन पिठं सुकीच भाजून पण त्याचे थालीपीठ बनवलं तर छानच खमंग लागतं. बाजारात पण तयार भाजणीचे थालीपीठाचे पीठ मिळतं.महाराष्ट्रातील घरांमधे कधी जर कोणी घरी भुकेने आला तर त्याला पटकन थालीपीठ करुन देण्यासाठी आजी, आई, काकी, मामी अग्रेसर असतात. गरमागरम खमंग खुसखुशीत दोन थालीपीठं जरी खाल्ली तरी मस्त पोट आणि मन तृप्त होतं. थालीपीठा बरोबर लोण्याचा गोळा असेल तर पर्वणीच असते. Ujwala Rangnekar -
स्प्रिंग ओनिअन थालिपीठ (spring onion thalipeeth recipe in marathi)
थालिपीठ आणि ताजे लोणी हे काॅम्बिनेशन भन्नाट आहे आणि सोबत कोणतीही तिखट चटणी असेल तर अगदी उत्तमच.भाजणी चे पिठ नसले तरी आपण मिक्स पिठाची थालिपीठ बनवू शकतो. Supriya Devkar -
More Recipes
- तिरंगा कोशिंबीर (tiranga koshimbir recipe in marathi)
- ड्रायफ्रूट मोदक (dry fruits modak recipe in marathi)
- आंबट गोड वरण (ambat god varan recipe in marathi)
- काजू मोदक(स्वातंत्र्य दिवस स्पेशल तिरंगा) (kaju modak recipe in marathi)
- पौष्टिक मिक्स व्हेज तिरंगा रवा ढोकळा (mix veg rava dhokla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15361292
टिप्पण्या (4)