पांढऱ्या कांदया चे लोणचे

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

उन्हाळ्याच्या दिवसात पांढरा कांदा खाणे अतिशय फायदेशिर असते.हा कांदा औषधी आहे हृदयाचे आरोग्य सुधारून कर्क रोगापासून बचाव होतो. हा कांदा कच्चा खाणे जास्त चांगले. वेगवेग्याळ्या कोशिंबिरी आणि सॅलड मध्ये वापरतात. लोणचेही खूप टेम्टिंग लागते माझी मैत्रण संध्या देशपांडे हिच्याकडून मी ही रेसिपी शिकले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4व्यक्तींसाठी
  1. 3-4 लहानपांढरे कांदे
  2. 1मध्यम आकाराची कैरी
  3. 2 टेबल स्पूनरामबंधू आचार मसाला
  4. 1/2 टेबल स्पूनमीठ
  5. 1/2 टेबल स्पूनराई
  6. 1/4 टेबल स्पूनहिंग
  7. 1 टेबल स्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कांदयाची साले काढून पातळ उभा चिरुन घेणे. कैरीचे साल काढून किसून घेणे

  2. 2

    कांदा कैरी मिक्स करून त्यात रामबंधू आचार मसाला किंवा दुसरा कोणताही आचार मसाला, मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर फोडणी पात्र ठेऊन त्यात तेल घालून तापल्यावर त्यात राई व हिंग घालून फोडणी तयार करून थोडी थंड झाल्यावर कांदा कैरीच्या मिश्रणात ओतावी.मिसळून घ्यावे.

  4. 4

    पांढरा कांदा कैरीचे लोणचे तयार.
    पानावर डावी कडील बाजूस वाढावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes