भानोळे

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#न्यू इअर

भानोळे

#न्यू इअर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
१५ ते २० व्यक्तींसाठी
  1. २ मध्यम आकाराचे कोबी
  2. ६-७ पातीचा कांदा
  3. 2वाटी बेसन
  4. 1ओल्या नारळाचे दूध
  5. 6 (7 चमचे)तांदुळाची पिठी
  6. १चमचा हळद
  7. २ चमचे वाडवळी मसाला
  8. १ चमचा लाल तिखट
  9. 1 चमचाधणे जिरे पावडर
  10. चवीनुसार मीठ
  11. 1 चमचागरम मसाला

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    थंडी च्या ऋतु मध्ये जितकी मनाला प्रसन्नता मिळते, तितकीच ताज्या भाज्या ही आपल्याला खुणवत असतात. भानोळ ही वाडवळी समाजाची पारंपरिक पाककृती. हा समाज मुळातच शेती प्रधान असल्याने ताज्या आणि कुठलीही रासायनिक प्रक्रिया न झालेल्या भाज्या इथल्या स्वयंपाक घरात आपल्या रंग आणि चवीची उधळण करीत असतात. उकड हंडी आणि भानोळा हे त्यातीलच एक... तर चला पाहूया ही एक पारंपरिक....

  2. 2

    वरील साहित्य एकत्र घ्या. कोबी व पाती कांदा बारीक चिरून घ्यावा. नारळाचे दूध काढून घ्यावे आणि बेसन व तांदुळाची पिठी एकत्र करून भजी च्य पिठाप्रमाणे नारळाच्या दुधात पातळ करावे. गुठळी होणार नाही याची काळजी घ्यावी.

  3. 3

    एका पसरट भांड्यात थोडे जास्त तेल घ्या. गॅस मंद आचेवर असू द्या. तेल चांगले तापले की यात मोहरी जिरे हिंग यांची फोडणी घाला. फोडणी तडतडली की चिरलेला कोबी व पातीचा कांदा कांदा घाला व नीट ढवळून घ्या.

  4. 4

    दुसरी कडे बेसन व तांदुळाची पिठी नारळाच्या दुधात पातळ करून घ्या. आवश्यकता भासल्यास पाणी घाला, परंतु गुठळी होणार नाही व अधिक पातळ होणार नाही याची काळजी घ्या. या द्रव्यात चिमूट भर मिठ घालावे.

  5. 5

    आत्ता कोबी शिजत आला असेल तेव्हा त्यात हळद, मीठ, वाडवली मसाला, गरम मसाला, धणे जिरे पावडर ई साहित्य घालून नीट परतून घ्यावे. व झाकण ठेवून एक वाफ काढावी.

  6. 6

    झाकण काढून आता यात ओले बेसन हळू हळू सोडा. सोबत एका हाताने ढवळा नाही तर गुठळ्या होण्याची शक्यता असते.

  7. 7

    पुन्हा एकदा झाकून ठेवा व खमंग वास येऊ ला गे पर्यंत थांबा. एकदा छान सुवास आला की हलकेच एका पसरट थाळीत हा पदार्थ काढून घ्या. पदार्थाची खालील बाजू थाळी च्यावर वर येईल. आत्ता पुन्हा भांड्यात तेल घालून घ्या आणि पदार्थाची वरची बाजू जी अर्धवट शिजलेली आहे, तिला खाली सोडून पुन्हा पाच सात मिनीटे झा का

  8. 8

    पुन्हा एकदा छान खमंग वास येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि या पदार्थाच्या आवडीनुसार वड्या पाडा.... तयार भानोले..... नवीन वर्षात हा पदार्थ आमच्या घरी बनतोच बनतो. जसा हिवाळ्यात सरास उंधियो, आलेपाक तसा भानोल हे must..... मुद्दाम यात काही नावीन्य आणले नाही. अगदी माझ्या आजेसासुबईपासून जसा बनत आला आहे, अगदी थोडी ही फेरफार न करता पारंपरिक रुपात... माझ्या लाडक्या Cookpad परिवारासाठी तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes