गोवन सोराक करी (goan sorak curry recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#रेसिपीबुक
#week4
मी कुठेही गेले तर सर्वप्रथम तिथे तयार होणाऱ्या स्थानिक घरगुती जेवणाचा शोध घेत असते ,कारण आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेलो तर साधारणपणे हॉटेलमध्ये तेच ते प्रकार जेवणाचे मिळत असते आणि स्थानिक ठिकाणी जर शोध घेतला तर नक्कीच तुम्हाला तिथली खाद्य परंपरा तर कळतेच, पण जिभेला सुद्धा एक नवीन स्वाद मिळतो .असाच स्वाद मला मी गोव्याला फिरायला गेले होते दोन वर्षांपूर्वी तिथे मिळाला. मंगेशी चे दर्शन झाल्यानंतर आमची टॅक्सी संध्याकाळी आमच्या हॉटेलला परतत असताना मी ड्रायव्हर जवळ विषय काढला आणि त्याला माझी घरगुती जेवणाची इच्छा बोलून दाखवली .तो तिथला स्थानिक असल्यामुळे त्याने जवळच एका घरगुती खानावळीत आम्हाला नेले. तिथल्या मावशीने गोव्याच्या भाषेत माझ्याशी संभाषण सुरू केले, गरमागरम भात आणि आमच्या समोरच मातीच्या भांड्यात तयार केलेली हीच सोराक करी अतिशय आत्मीयतेने वाढली..
गोव्यामध्ये मासे खाणाऱ्यां सोबतच शाकाहारी खाद्यशैली जपणारे सुद्धा काही परिवार आहेत त्यांना "शिवराक" असे संबोधल्या जाते .या शिवराक नावाचा अपभ्रंश , ह्या करीचे नाव "सोराक" असेल असे मला वाटते. अत्यंत कमी साहित्यात तयार झालेली नारळाच्या चवीची ही करी अतिशय उत्तम झाली होती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4ओल्या नारळाचे बारीक काप
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या भिजवलेल्या
  4. 2 टीस्पूनधणे पावडर
  5. 8-10लसणाच्या कळ्या
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टी स्पूनहळद
  8. 2 टेबल स्पूननारळाचे तेल (खाण्याचे खोबरेल तेल)
  9. 4 ते 5आमसुलं किंवा एक टेबल स्पून कोकम आगळ
  10. 1टिस्पून जिरे

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व जिन्नस एका ठिकाणी तयार ठेवून एक कांदा बारीक चिरावा व दुसरा कांदा थोडा जाड चिरावा.आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जाड चिरलेला कांदा, नारळाचे तुकडे,लसूण, धणेपूड,मीठ,भिजवलेल्या लाल मिरच्या व हळद इत्यादी घेऊन एकजीव वाटण करून घ्यावे.

  2. 2

    आता गॅसवर मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये खाण्याचे खोबरेल तेल घालावे. तेल गरम झाल्यावर जिऱ्याची फोडणी देऊन बारीक चिरलेला कांदा परतावा. कांद्याचा रंग बदलल्यावर त्यामध्ये वाटण घालावे. सारखे हलवत राहून वाटण कोरडे झाल्यावर आमसुलाचे पाणी किंवा आगळ घालून पुन्हा थोडे परतावे.

  3. 3

    आता यामध्ये साधारण अर्धा लिटर पेक्षा थोडे जास्ती पाणी घालून भरपूर उकळ्या येऊ द्याव्यात. थोड्या वेळाने गॅस बंद करावा. आपली सोराक करी तयार आहे.गरमागरम भात किंवा कुठल्याही भाकरीसोबत अतिशय स्वादिष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या (8)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
अप्रतिम...झटपट होणारी 😋😋👌👍🌹

Similar Recipes