हुर्ड्याचा पौष्टिक ढोकळा

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#विंटरस्पेशल
हिवाळ्याची चाहुल लागली की सगळीकडे टहाळ(ओला हरबरा) आणि हुर्डा दिसायला लागतो. चहुकडे हुर्डा पार्टी चे आयोजन केले जाते. ह्याच हुर्ड्याचा पौष्टिक ढोकळा आज केला. मस्त हेल्दी आणि टेस्टी. #विंटर स्पेशल

हुर्ड्याचा पौष्टिक ढोकळा

#विंटरस्पेशल
हिवाळ्याची चाहुल लागली की सगळीकडे टहाळ(ओला हरबरा) आणि हुर्डा दिसायला लागतो. चहुकडे हुर्डा पार्टी चे आयोजन केले जाते. ह्याच हुर्ड्याचा पौष्टिक ढोकळा आज केला. मस्त हेल्दी आणि टेस्टी. #विंटर स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ११/२ कप तांदळाच पीठ,
  2. 1/4 कपज्वारीच पीठ
  3. १ कप ताज्या हुर्ड्याची पेस्ट,
  4. 2 टीस्पूनआल लसुण हिरवी मिरची पेस्ट,
  5. 1/2 टीस्पूनबेकींग सोडा,
  6. 1/2 कपकोथिंबीर,
  7. मीठ चवीनुसार,
  8. 1/4 टीस्पूनहळद,
  9. 1 टीस्पूनलाल तिखट,
  10. 1/2 टीस्पूनधणेपूड,
  11. गरजेनुसार पाणी
  12. फोडणीसाठी: तेल,जीरे,कडीपत्ता, तीळ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका मोठ्या भांड्यात तांदळाच पीठ,ज्वारीच पीठ,हुर्ड्याची पेस्ट,आल-लसुण-मिरची पेस्ट,हळद,लाल तिखट,धणेपूड, मीठ,बेकींग सोडा एकत्रित करून गरजेनुसार पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.

  2. 2

    व त्याचे गोल आकाराचा ढोकळा तयार करून घ्या.

  3. 3

    स्टिमरमधे प्लेटला तेल लाऊन गोल आकार देऊन ढोकळा १५मिनिटे वाफवून घ्या.

  4. 4

    आता तेलाची जीरे,तीळ,कडीपत्ता घालून फोडणी तयार करा.
    गरम ढोकळा फोडणी घालून लसणाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.#OneRecipeOneTree #विंटर स्पेशल हुर्ड्याचा पौष्टिक ढोकळा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes