छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#EB16 #W16 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त गरमागरम आणि झणझणीत छोले भटूरे .

छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)

#EB16 #W16 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त गरमागरम आणि झणझणीत छोले भटूरे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. 1/2काबुली चणे
  2. 2कांदे
  3. 3टॕमेटो
  4. अल + लहसुन पेस्ट
  5. 1 चमचाजीरे
  6. 2 चमचेलाल तिखट
  7. 1/2 चमचागरम मसाला
  8. 1 मोठा चमचाछोले मसाला
  9. 4मोठे चमचे तेल
  10. 2 कपमैदा
  11. 1/4 कपरवा
  12. 2 चिमुटभरसोडा
  13. 1 चमचामीठ
  14. 1/2 कपगव्हाचे पीठ
  15. पाणी गरजेनुसार
  16. कोथिंबीर
  17. 4तमालपत्र
  18. 1/2 चमचाहळद
  19. 1 चमचाधने पावडर
  20. 1/2 चमचाराई पावडर

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम भटूरे चे पीठ मळून घेऊयात - पराती मध्ये २ कप मैदा चाळून घेऊन त्यात १/२ गव्हाचे पीठ घालून त्यात १ चमचा मीठ, खायचा सोडा २ चिमुटभर आणि १ मोठा चमचा तेल घालून ते आधी सर्व नीट एकत्र करून घ्या. आता त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ थोडे घट्टच मळावे. आता मळून झाल्यावर त्या वर थोडे तेल लावून ते पीठ झाकुन ३ तास बाजूला ठेवून द्यावे.

  2. 2

    आता छोले करून घेऊयात - रात्री काबुली चणे पाण्यात घालून ठेवावेत. व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातले उपसुन काढून ते परत एकदा स्वच्छ धुऊन घ्या. आता कुकरमध्ये चणे घालून त्यात दिठ कप पाणी घालून झाकण लावून गॕस चालू करून ७ शिट्टया होऊन द्यावेत.

  3. 3

    आता मसाला करुयात - प्रथम कढईत ४ मोठे चमचे तेल गरम करून त्यात १ चमचा जीरे फुलुन घ्यावे. आता त्यात ४ तमालपत्र, २ बारीक कापलेले कांदे घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतुन घ्यावे. आता त्यात ३ टॕमेटो बारीक कापून घालून त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्या. आता टॕमेटो छान मऊ झाले पाहिजेत. नंतर त्यात १/२ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, धने पावडर १ चमचा, राई पावडर १/२ चमचा १ मोठा चमचा छोले मसाला आता हे सर्व छान एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून परत एकदा परतुन घ्या.

  4. 4

    आता त्यात पाव कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढून घ्या.

  5. 5

    आता तो मसाला छान शिजला की त्यात उकडून घेतलेले काबुली चणे पाण्यासकट घालून आणि त्यात अजून १ कप पाणी घालून ते छान ढवळून घेऊन आणि परत झाकून ७ ते ८ छान वाफ काढून घ्यावी.

  6. 6

    आता ७ ते ८ मिनिटांनी गॕस बंद करून त्यावर कोथिंबीर बारीक घालावी. तयार आहे झणझणीत गरमारम छोले.

  7. 7

    ३ तासांनी भटुरे करण्यासाठी पीठ छान तयार झाले आहे. आता कढईत तेल गरम करायला ठेवावेत. आता ते पीठ परत एकदा छान ५ ते ७ मिनिटे मळुन घ्यावे.आता त्याचा थोडा जाडसर गोळा करून तो चपातीच्या आकारासारखा लाटून घ्यावा. आता त्या गरम तेलात ते सोडून तो पुरीसारखा तळुन घ्यावा. आता सर्व असेच तळुन घ्या. तयार आहेत गरमागरम भटुरे.

  8. 8

    अश्या प्रकारे तयार आहेत...... मस्त गरमागरम आणि झणझणीत (छोले भटुरे)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes