रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 किलो लालभडक गाजर,
  2. पाऊण लिटर उकळलेले दूध,
  3. १ मोठी वाटी साखर,
  4. काजू बदाम आवडीनुसार,
  5. १ मोठा चमचाहिरवी वेलची पूड
  6. पाव वाटी साजूक तूप
  7. मिल्कमेड आवडीनुसार,
  8. अर्धी वाटीफ्रेश क्रीम मलाई

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून त्यावरील सालं अलगद काढून मध्यम जाळीच्या किसणीवर किसून घ्यावी.

  2. 2

    आता कूकरमध्ये हा किस थोड्याश्या तुपावर परतवून झाकण लावून २ शिट्या होऊ द्यावा यामुळे गाजर किस पटकन शिजतो आणि पाणी हि लगेच आळते

  3. 3

    कुकर मधली वाफ निघून गेल्यावर शिजलेला किस बाहेर काढून घ्यावा आणि पुन्हा कुकर मध्ये मंद आचेवर उरलेले तूप घालावे

  4. 4

    आता या तुपात काजू बदाम (आणखी जो काही सुकामेवा घेतला असेल तो) सर्व परतून काढून घ्यावे.

  5. 5

    त्यावर शिजलेला गाजर किस घालून तो सुद्धा हलकासा परतावा

  6. 6

    आता या मध्ये उकळलेले दूध ओतून छान ढवळत राहावे

  7. 7

    दूध आटत आले कि यात आवडत असेल तर थोडी मलाई म्हणजेच फ्रेश क्रिम आणि मिल्कमेड घालून पुन्हा लगेच ढवळावे.मिल्कमेड घातले असेल तर साखर त्या अंदाजाने थोडी कमीच घालावी नाहीतर १ मोठी वाटी भर साखर घालून परतत राहावे.साखर पाणी होऊन सुकले कि गॅस बंद करावा... थोडी वाफ निघून गेल्यावर वेलची पूड घालावी नाहीतर त्याचा सुगंध फार काळ टिकत नाही. आणि साखर सर्वात शेवटी घातल्याने ती जास्त शिजत नाही आणि त्यामुळे तिची कॅरॅमलाईझ होण्याची कृती थांबते यामुळेच गाजर हलव्याचा रंग छान लाल दिसतो.

  8. 8

    सर्व्ह करताना काजू सोबत पिस्ता घालून गार्निश करून द्याव.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes