गाजर हलवा

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#गोड
हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात लालचुटुक गाजर दिसली की एकदातरी हलवा करायलाच हवा. मग कोणी गाजर खायला बघत नसले तरी हलवा खाणारच. आता हलवा करायचा म्हटलं तर गाजर लालचुटुक आणि जून असावीत म्हणजे हलवा छान होतो. गाजराचा आतील भाग दांडा पिवळसर असेल तर गाजर बाजूने किसून घ्यावे आतील पिवळसर भाग किसू नये. नाहीतर हलव्याची चव बिघडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. ५०० ग्राम गाजर
  2. २५० मिली मलाई सहित म्हशीचे दूध
  3. ५ टिस्पून साखर
  4. २ टिस्पून मिल्क पावडर
  5. १ टिस्पून वेलचीपूड
  6. १ टिस्पून तूप
  7. ड्रायफ्रूट्स आवडीनुसार
  8. सजावटीसाठी पिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    गाजर सोलून किसणीवर किसून घ्या.

  2. 2

    कढईत तूप घालून गाजराचा किस परतून घ्यावा.

  3. 3

    नंतर मलई सहित दूध घालून शिजवून घ्या.

  4. 4

    साखर घाला. साखर घातली की मिश्रण पातळ होईल तेव्हा गॅस मोठ्या आचेवर ठेवून शिजवा. मध्ये मध्ये ढवळत रहा नाहीतर लागण्याची शक्यता

  5. 5

    मिश्रण घट्ट झाले की ड्रायफ्रूट्स, वेलचीपूड घाला, गॅस बंद करा

  6. 6

    थोड्यावेळाने मिल्क पावडर घालून मिक्स करा.

  7. 7

    खाण्यास तयार आहे गाजर हलवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes