बासबूसा रवा केक

Adarsha Mangave
Adarsha Mangave @adarsha_m
Bangalore

#प्रेमासाठी - सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आशा आहे ही रेसिपी तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

बासबूसा रवा केक

#प्रेमासाठी - सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आशा आहे ही रेसिपी तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-३
  1. 1कप रवा
  2. 1कप साखर
  3. 1कप दही
  4. 1टीस्पून बेकिंग पावडर
  5. १/२ कप दूध
  6. १/२ कप लोणी / तूप
  7. काही गुलाबांच्या पाकळ्या
  8. काही बदाम फ्लेक्स
  9. काही नारळ फ्लेक्स
  10. 1टिस्पून व्हॅनिला इसेन्स
  11. साखर सिरप साठी -
  12. 3/4कप साखर
  13. 1कप पाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कुकरची शिटी आणि काळा रिंग / सील काढा. - कुकरला 10 मिनिटे गरम (प्रीहिट)करा.

  2. 2

    एका मिक्सिंग बाऊल मधे सर्व कोरडे साहित्य मिक्स करावे.आता ह्यामध्ये तूप, दही, व्हॅनिला इसेन्स, घाला.

  3. 3

    आता सुसंगततेची काळजी घेत दूध थोडेसे घाला व मऊ होईपर्यंत मिश्रण एका दिशेने फिरवा.

  4. 4

    एक ग्रीस पॅनमध्ये आता हे मिश्रण घाला व त्यावर बदाम काप घाला.

  5. 5

    हे पॅन दोनदा टॅप करुन कुकरमध्ये ठेवा.
    - कुकर मध्ये मीठ घाला व पॅन आणि कुकर दरम्यान थेट संपर्क टाळा तसेच एक स्टँड आत मधे ठेवा.

  6. 6

    पहिल्या ५ मिनिटात ज्योत जास्त ठेवा.
    यानंतर 20 मिनिटे मंद आचेवर केक बेक करावे.

  7. 7

    आता टूथपिक किंवा चाकूच्या सहाय्याने केक तपासा, जर तो स्वच्छ बाहेर आला तर तुमचा केक तयार आहे. अन्यथा आणखी काही मिनिटे बेक करा.

  8. 8

    कुकरमधून पॅन काढा, ते थंड होऊ द्या आणि नंतर केक प्लेटमध्ये अनमोल्ड करा. आता यावर साखर सिरप घाला. साखर सिरप मुळे केक सॉफ्ट, मऊ राहण्यास मदत होते.

  9. 9

    साखर सिरप - कढईत साखर आणि पाणी घाला आणि साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत उकळवा. नंतर मंद आचेवर २-३ मिनिटे उकळा.

  10. 10

    आता गुलाबाच्या पाकळ्या, बदाम फ्लेक्स आणि नारळ फ्लेक्स घालून गार्निश करा. बासबूसा रवा केक सर्व करण्यासाठी तयार आहे. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adarsha Mangave
रोजी
Bangalore
Adis KitchenHealthy Food - Healthy Life 😊
पुढे वाचा

Similar Recipes