पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Heart #A Heart-y Challenge
रंग दे सारी गुलाबी चुनरिया..
आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे..
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️
कसा ते बघू या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनीटे
5 जणांना
  1. 2 कपरवा
  2. 1 कपदूध
  3. 1 कपदही
  4. 1 कपसाखर
  5. 1/2 कपलोणी अगर साजूक तूप
  6. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1/2 कप मैदा
  9. खायचा रंग
  10. गुलाबाच्या पाकळ्या
  11. रोझ इसेन्स
  12. बदाम पिस्ता काप
  13. वेलची पावडर

कुकिंग सूचना

60 मिनीटे
  1. 1

    प्रथम दह्यात साखर घालून चांगले घोटून घ्या नंतर त्यात दूध रवा वेलदोडा पावडर लोणी घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करुन चांगले घोटून घ्या. आणि हे मिश्रण दोन तास झाकून ठेवा

  2. 2

    दोन तासानंतर मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घ्या घ्या आणि वरील मिश्रणात हळूहळू करून मिक्स करा यातच खायचा रंग रोझ इसेन्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून मिश्रण एकजीव करा.

  3. 3

    ग्रीस केलेल्या टीन मध्ये वरील केकचे मिश्रण ओतून घ्या वरून पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या पसरवा आणि प्री-हीट केलेल्या कढईमध्ये मीठ घालून
    यावर stand ठेवून केकचा टीन ठेवा आणि पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे केक बेक करा.टूथपिक ने चेक करा.

  4. 4

    केक बेक झाल्यावर थंड करून केक टीन मधून डी मोल्ड करा.

  5. 5

    तयार झाला आपला पारंपारिक रोझ रवा केक.. केकचे स्लाइस करून एका डिश मध्ये ठेवा आणि सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes