व्हेज मंचाउ सूप

Sonali Parkhe
Sonali Parkhe @cook_19424989
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपबारीक चिरलेला कोबी
  2. 1 कपबारीक चिरलेले गाजर
  3. 1/4 कपबारीक चिरलेला पातीचा कांदा
  4. 1/4 कपबारीक चिरलेली कांद्याची पात
  5. 6,7लसूण पाकळ्या
  6. 1 इंचआलं तुकडा
  7. 1 टीस्पूनव्हिनेगर
  8. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  9. 1टेबलस्पू्न सोया सॉस
  10. 1/2 टीस्पूनमिरेपूड
  11. चवीपुरते मीठ
  12. कोथिंबीर
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोव्हर
  15. 1/ पॅकेट हक्का नूडल्स
  16. 2 कपतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका भांड्यात 3 ग्लास पाणी घेऊन त्यामधे थोडा कोबी, गाजर,पातीचा कांदा व थोड्या कोथिंबिरीच्या काड्या घालून ते पाणी निम्मे होईपर्यंत उकळून घेणे.थंड झाले की ते पाणी गाळून घेऊन एका बाउल मध्ये काढून बाजूला ठेवणे. हा आपला सूप साठी स्टॉक तयार झाला.

  2. 2

    दुसऱ्या पॅन मध्ये थोडे तेल टाकणे व ते गरम झाले की त्यामधे आलं लसूण चिरून टाकणे 2 मिनिटं परतवून घेणे.त्यांनतर त्यामधे कोबी,गाजर,पातीचा कांदा घालणे व परतणे. नंतर त्यामधे सोया सॉस व चिली सॉस घालून 2 मिनटं परतणे.

  3. 3

    त्यानंतर त्यामधे आपण तयार केलेला स्टॉक घालुन 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ देणे मग त्यामधे व्हिनेगर घालणे. चवीपुरते मीठ घालणे व पाणी घालून एक उकळी येऊ देणे. नंतर त्यामध्ये मिरेपूड व पातीचा कांदा घालून 1 मिनिटं उकळी येऊ देणे. हे झाले आपले व्हेज मंचाऊ सूप तयार.

  4. 4

    एका भांड्यात पाणी उकळत ठेवून ते उकळले की त्यामध्ये हक्का नूडल्स टाकून 2 मिनिटं वाफवून घेणे. नंतर ते एका प्लेट मधे काढून घेऊन त्यावर कॉर्नफ्लोव्हर घालून मिक्स करून घेणे व तेलात तळून घेणे हे झाले आपले फ्राय नूडल्स तयार.

  5. 5

    तयार सूप मधे फ्राय नूडल्स घालून गरम गरम सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Parkhe
Sonali Parkhe @cook_19424989
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes