चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#CHR
पटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल

चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)

#CHR
पटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीहक्का नूडल्स
  2. तळण्यासाठी तेल
  3. चवीनुसारमीठ
  4. 2 टेबलस्पूनशेजवान सॉस
  5. 1/2 टेबलस्पूनसोया सॉस
  6. 1/2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  7. 3 वाटीकच्चा कोबी उभा बारीक चिरलेला
  8. 2 वाटीकांद्याची पात कांद्याचा बारीक चिरलेली
  9. 1 वाटीकॉर्न फ्लोर

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवावे त्यात मीठ घालावे ते उकळले की त्यामध्ये हक्का नूडल्स घालून त्या शिजवून घ्याव्या व चाळणी मध्ये पाणी काढून साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन निथळत ठेवाव्या

  2. 2

    मग थोड्या थोड्या नूडल्स घेऊन त्यांना कॉर्नफ्लोर लावावे व गरम तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्याव्या अशा सर्व नूडल्स तळून घ्याव्यात

  3. 3

    मग शेजवान सॉस सोया सॉस टोमॅटो सॉस एकत्र करून त्यामध्ये कोबी व कांद्याची पात एकत्र करून सर्व मिक्स करावे लागेल तसे मीठ घालावे कारण सॉस मध्येही मीठ असते

  4. 4

    त्यामध्ये तळलेल्या नूडल्स खालून सगळे एकजीव करून खायला द्यावे या घरी केलेल्या नूडल्स बाहेरच्या नूडल्स पेक्षा अतिशय टेस्टी व हेल्दी होतात

  5. 5

    खायला देताना त्यावर थोडी खूप भी व कांद्याची पात घालून खायला द्यावे अतिशय टेस्टी भेळ होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes