बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#भजी रेसिपी

बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#भजी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. 3/4 मेजरींग कप बेसन
  2. १ १/२ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  3. 1 टिस्पून ओवा
  4. १ १/२ टिस्पून तिखट
  5. 1/2 टिस्पून हळद
  6. 1/4 टिस्पून हिंग
  7. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 1 टिस्पून चाट मसाला
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम एका वाडग्यात बेसन घेतले. बटाटे स्वच्छ धुऊन त्याच्या चकत्या करून पाण्यामध्ये टाकून ठेवल्या.

  2. 2

    वरील बेसन मधे तिखट, मीठ ओवा हिंग हळद चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घेतले. त्यात तांदळाचे पीठ मिक्स केले.

  3. 3

    आता या मिश्रणात पाणी मिक्स करून बॅटर बनवून घेतले ते चांगले फेटून घेतले त्यात गरम तेलाचे मोहन घातले.

  4. 4

    वरील बॅटर मध्ये बटाट्याच्या चकत्या डीप करून गॅसवरील कढईमध्ये गरम तेलात मध्यम आचेवर सर्व भजी तळून घेतली.

  5. 5

    आता तयार बटाटा भजी डिशमध्ये ठेवून तळलेल्या हिरव्या मिरची बरोबर सर्व्ह केली. ही चवीला अतिशय सुंदर होता. तांदळाच्या पिठामुळे त्याला थोडा क्रिस्पीनेस चांगला येतो व या पावसाळ्याच्या दिवसात खायला छान वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes