मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#फोटोग्राफी
#भजी
गरमागरम खुसखुशीत भजी सगळ्यांनाच आवडतात. ही जरा वेगळ्या प्रकारची भजी आहेत ज्यात मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घातली आहे. खुसखुशीत करण्यासाठी मी भज्यांमध्ये शिजलेला भात आणि ओट्स घालते. मस्त होतात भजी.

मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी

#फोटोग्राफी
#भजी
गरमागरम खुसखुशीत भजी सगळ्यांनाच आवडतात. ही जरा वेगळ्या प्रकारची भजी आहेत ज्यात मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घातली आहे. खुसखुशीत करण्यासाठी मी भज्यांमध्ये शिजलेला भात आणि ओट्स घालते. मस्त होतात भजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमक्याचे दाणे
  2. 1 कपकोथिंबीर
  3. कांदा मध्यम बारीक चिरून
  4. 1/2 टीस्पूनठेचलेलं आलं
  5. 1/2 कपओट्स
  6. 1 कपशिजवलेला भात
  7. 4 टेबलस्पूनबेसन अंदाजे
  8. 2 टेबलस्पूनतांदुळाचं पीठ
  9. 1/2 टीस्पूनठेचलेली मिरची
  10. 1/2 टीस्पूनजिरे
  11. पाव ते अर्धा टीस्पूनहळद
  12. 1/2 टीस्पूनओवा
  13. चवीनुसारमीठ
  14. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  15. तेल भजी तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    मक्याचे दाणे पाणी घालून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवून घ्या. नाहीतर प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

  2. 2

    मक्याच्या दाण्यामधलं पाणी काढून टाका आणि दाणे गार झाल्यावर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

  3. 3

    एका वाडग्यात वर दिलेलं तेल वगळून सर्व साहित्य एकत्र करा. पिठाचे गोळे करता येतील इतपत घट्ट असावे. जरूर असेल तर थोडं पाणी किंवा बेसन घाला.

  4. 4

    आता कढईत भजी तळण्यासाठी तेल गरम करा.

  5. 5

    तयार पिठामध्ये २ टेबलस्पून गरम तेल घालून मिक्स करा.

  6. 6

    गॅस मंद करून पिठाचे छोटे छोटे जरा चपटे गोळे तेलात सोडा आणि फिकट तपकिरी रंगावर तळून घ्या.

  7. 7

    गरमागरम भजी चटणी / सॉस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes