सरंग्याच कालवण(Pomfret curry)

Gauri Deshpande
Gauri Deshpande @cook_20707748

# सी फूड

सरंग्याच कालवण(Pomfret curry)

# सी फूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 min
2 servings
  1. पाच तुकडेसाहित्य-सरंग्याचे (पापलेट)
  2. 5/6लसूण पाकळी
  3. 2हिरव्या मिरच्या,जरा कोथिंबीर,4 पाकळ्या लसूण, 3चमचे चिंच कोळ
  4. 1/4 वाटीओल खोबर
  5. स्वादानुसार
  6. हळद,तिखट, मीठ, तेल

कुकिंग सूचना

25 min
  1. 1

    प्रथम पापलेट स्वच्छ धूऊन तुकडे करावे.

  2. 2

    त्याला हळद, तिखट, मीठ आणि हिरवं वाटण,चिंच कोळ सगळे नीट चोळून किमान 15 मिनिटे ठेवावे.
    नारळ खवणून अगदी गंधगोळ वाटावा.

  3. 3

    मॅरिनेट केलेले फिश हळूवार तेलावर टाकावे.सॉसपॅन खालीवर करून ते पांच मिनीटे परतावे.

  4. 4

    तेल तापत ठेवावे, त्यात लसूण पाकळ्या ठेचून मंद फ्लेम वर तांबूस कराव्या.

  5. 5

    कालथा लावू नये.कारण तुकडे मोडतील.परतुन झाले की त्यात दोन वाट्या पाणी घालावे.ऊकळी आली की वाटलेला नारळ घालावा.

  6. 6

    जरा मीठ घालावे.आधी तुकड्यांना मीठ लावले आहे.त्यामुळे मीठ अंदाज घेऊन टाकावे.

  7. 7

    छान ऊकळी आली की गॅस बंद करावा.
    यात कुठलेही मसाले मी घातले नाहीत कारण मुळात फिश ची चव कालवणात यायला हवी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gauri Deshpande
Gauri Deshpande @cook_20707748
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes