शिंपल्यांचे कटलेट (Clams Cutlet recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#सीफूड

#शिंपल्यांचे कटलेट
(#Clam_Cutlate)

मासेखाऊंसाठी शिंपल्यांचे पदार्थ ही एक नजाकत,तर नव्याने मासे खाणाऱ्सायांठी,शिंपल्ल्या म्हणजे बिनधास्त खाता येणारा बिनकाट्यांचा मत्स्यप्रकार.

नुसतेे उकडून खाल्ले तरी चविष्ट लागणार.मीठसुद्धा घालायची गरज नाही.

मुळात इतके चविष्ट असताना त्यावर मीठमसल्याचे संस्कार झाल्यावर पाहायलाच नकोत.

समुद्रकिनाऱ्यावरच्या,आद्य सुगरणींनी त्यांची कल्पकता दाखवून वेगवेगळे रश्श्यांचे प्रकार,तसेच सुके, डांगर(वड्या),इ.प्रकारांनी त्यांची चव वाढवलीच.

यातलाच एक प्रकार म्हणजे कटलेट,इंग्रज भारतातून गेले तरी त्यांच्या कटलेटची, खवय्यांच्या दुनियेत, वेगवेगळी रूपांतरे होत राहिली आहेत .हे एक रूपांतर माझ्या हातचं, तुम्हीही करून आणि चाखून पहा.

घ्या तर साहित्य गोळा करायला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चार
  1. साहित्य:-
  2. 100 ग्रॅमशिंपल्या उकडून काढलेले मांस(याला माष्ट म्हणतात.)
  3. 2मध्यम बटाटे उकडून चुरलेले
  4. 50 ग्रॅमबारीक रवा किंब ब्रेडक्रम्ब
  5. 50 ग्रॅमबारीक चिरलेला कांदा एक थेंब तेलावर भाजून
  6. 10 ग्रॅमलाल मिर्चीपूड,
  7. 5 ग्रॅमहळदपूड,
  8. 10 ग्रॅमधणेपूड,
  9. 1 प ग्रॅम गरम मसाला पूड,
  10. 1हिरवी मिरची बारीक चिरून,
  11. 50 ग्रॅमकोथिंबीर,बारीक चिरून,
  12. मीठ चवीनुसार
  13. 50 ग्रॅमतांदळाचा रवा
  14. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    अनुक्रमांक एक ते अकरापर्यंतचे साहित्य नीट मिसळूब घ्य

  2. 2

    मिश्रणाची चव पाहून मीठ घाला.कारण शिंपल्याना अंगाचा खरटपणा असतो.

  3. 3

    मिश्रणाचे गोळे बनवून गोल किंवा मनपसंत आकार द्या..

  4. 4

    पॅनमध्ये तेल घालून गरम करा.कटलेट्स तांदळाच्या रव्यात घोळवून मंद आचेवर दोहो बाजूने तळा.

  5. 5

    खोबऱ्याची चटणी,सॉस कशाहीसोबत आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नूतन सावंत
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes