सुजी बेसन क्रिस्पी ट्रँगल

Aishwarya Deshpande
Aishwarya Deshpande @cook_22672782
पुणे

नाश्त्याला रोज रोज पोहे,उपमा खाऊन कंटाळलात?मग हा झटपट पोटभरीचा असा नाश्त्याच्या प्रकार नक्की करून बघा..😊

सुजी बेसन क्रिस्पी ट्रँगल

नाश्त्याला रोज रोज पोहे,उपमा खाऊन कंटाळलात?मग हा झटपट पोटभरीचा असा नाश्त्याच्या प्रकार नक्की करून बघा..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 वाटीबेसन पीठ
  2. 1/2 वाटीरवा
  3. 1बटाटा
  4. 1कांदा
  5. 1टोमॅटो
  6. 1हिरवी मिरची
  7. कढीपत्ता
  8. कोथिंबीर
  9. चिली फ्लॅक्स
  10. 1/2 चमचातिखट
  11. 1/4 चमचाहळद
  12. 1/2 चमचाजीरे पूड
  13. 1/2 चमचागरम मसाला
  14. 1/2 चमचापाव भाजी मसाला
  15. 1/2 चमचालिंबू रस
  16. चिमूटभरखायचा सोडा
  17. मीठ
  18. 1 कपपाणी
  19. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये वरील दिलेल्या प्रमाणात रवा, बेसन पीठ,1 किसलेला कच्चा बटाटा घेणे.. त्यानंतर त्यात 1कप पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घेणे..त्यानंतर हे मिश्रण 10-15मिनटं झाकून ठेवावे

  2. 2

    वरील मिश्रणात बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो,हिरवी मिरची,कढीपत्ता, कोथिंबीर,हळद,chilly flex, लाल तिखट,जीरे पावडर,गरम मसाला,पाव भाजी मसाला,लिंबु रस,चिमूटभर खायचा सोडा आणि मीठ घालून वरील सर्व मिश्रण एकजीव करून घेणे..गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालावे

  3. 3

    त्यानंतर 1 पसरट बाउल घेणे..त्याला खाली सर्व बाजूनी तेल लावून घेणे..वरील मिश्रण त्या बाउल मध्ये घालणे व एकसारखे करणे..त्यानंतर एका कढईत पाणी गरम करत ठेवावे व मिश्रण असलेला बाउल त्यात ठेवणे आणि 10-15मिनटं वाफेवर शिजवावे

  4. 4

    10-15 मिनीटांनी बाउल बाहेर काढणे व गार होऊ देणे.. त्यानंतर गार झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेणे व त्याचे trangles shape मध्ये कट करून घेणे

  5. 5

    वरील कट केलेले trangles shalow फ्राय करून घेणे..डीप फ्राय केले तरी चालतील..सुजी बेसन crispy trangles तय्यार..टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aishwarya Deshpande
Aishwarya Deshpande @cook_22672782
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes