कोबी-चीज आप्पे (kobi cheese appe recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

कोबी ची मस्त रेसिपी आहे. मैत्रिणींनो नक्की करून बघा. कोथिंबीर चटणी सोबत खा.

कोबी-चीज आप्पे (kobi cheese appe recipe in marathi)

कोबी ची मस्त रेसिपी आहे. मैत्रिणींनो नक्की करून बघा. कोथिंबीर चटणी सोबत खा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15/20 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1/2 कपकिसलेला कोबी
  2. 1/2 कपकिसलेले चीज
  3. 1/2 कपकिसलेला बटाटा
  4. 2हिरव्या मिरच्या मध्यम आकाराच्या
  5. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पूड
  6. 1/2 कपरवा
  7. थोडी कोथिंबीर
  8. 1/2 टीस्पूनमीठ
  9. चिमूटभरखायचा सोडा

कुकिंग सूचना

15/20 मिनिटे
  1. 1

    एका बाऊल मध्ये रवा,दही,पाणी घालून मिक्स करावे व बाजूला ठेवून द्यावे.मिश्रण घट्टच ठेवावे. पातळ करू नये.

  2. 2

    कोबी,चीज,बटाटा किसून घ्यावे. कोथिंबीर,हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावेत.

  3. 3

    एका भांड्यात भिजवलेला रवा,किसून घेतलेले सर्व साहित्य टाकावे.कोथिंबीर, हिरव्या मिरच्या,मीठ,काळीमिरी पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे.

  4. 4

    गॅसवर आप्पे पात्र मंद आचेवर तापत ठेवावे. त्याला तेल लावावे.मिश्रणात खायचा सोडा घालून मिक्स करून घेणे. आप्पे पात्रात थोडे थोडे मिश्रण घालून झाकण ठेवून भाजून घेणे.

  5. 5

    अधून मधून झाकण काढून पाहावे.थोडे तेल वरून सोडावे. उलटे करून दुसरी बाजू पण भाजून घेणे.

  6. 6

    हे आप्पे कोथिंबीर चटणी सोबत खावे. खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes