इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे.
तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात.

इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath

नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे.
तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2-3 जणांसाठी
  1. 1/2 कपबारीक रवा
  2. 1/4 कपदही
  3. थोडे पाणी
  4. 1 लहानकांदा
  5. 2 टेबलस्पूनसिमला मिरची चिरलेली
  6. 2 टेबलस्पूनटोमॅटो चिरलेला
  7. 2 लहानहिरव्या मिरच्या
  8. थोडी कोथिंबीर
  9. चिमूटभरखायचा सोडा
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. थोडे तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात दही,बारीक रवा घालून मिक्स करून घेणे. झाकून ठेवावे. कांदा, टोमॅटो,सिमला मिरची,हिरवी मिरची,कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घेणे.

  2. 2

    भिजलेल्या रवा आता थोडासा फुगलेला असेल. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेणे. त्यात चिरलेली सर्व साहित्य घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करणे. थोडेसे पाणी घालून मिश्रण मध्यमसर करून घेणे. जास्त पातळ नको व घट्टही नको.

  3. 3

    आता मिश्रणात चिमूटभर सोडा घालून घेणे. सोडा करतानाच घालायचा आहे. गॅसवर आप्पे पात्र तापत ठेवून, त्याला थोडेसे तेल लावून घेणे. गॅस मंद आचेवरच ठेवावा. आप्पे पात्रात थोडे-थोडे मिश्रण घालून घेणे.

  4. 4

    वरून झाकण ठेवावे. वरचे मिश्रण कोरडे झाली की ते उलटून घेणे. बाजूने थोडे तेल सोडणे. दोन-तीन मिनिटं भाजल्यानंतर आप्पे काढून घेणे. अशाप्रकारे सर्व आप्पे करून घेणे.

  5. 5

    हे आप्पे नुसते ही खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत ही खाऊ शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes