व्हेज मोमोज

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#स्ट्रीट
स्ट्रीटफूड मधे बरेच वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप आवडतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे मोमोज. हा पदार्थ मला आणि माझा घरातील सगळ्यांनाच खूप आवडतो. या मोमोज मधे स्टीम मोमोज आणि फ्राईड मोमोज असे दोन प्रकार बघायला मिळतात. त्यातील स्टीम मोमोज आम्हाला खूपच आवडतात. याची रेसिपी मी इथे देत आहे.

व्हेज मोमोज

#स्ट्रीट
स्ट्रीटफूड मधे बरेच वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप आवडतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे मोमोज. हा पदार्थ मला आणि माझा घरातील सगळ्यांनाच खूप आवडतो. या मोमोज मधे स्टीम मोमोज आणि फ्राईड मोमोज असे दोन प्रकार बघायला मिळतात. त्यातील स्टीम मोमोज आम्हाला खूपच आवडतात. याची रेसिपी मी इथे देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्रॅम मैदा
  2. ५०० ग्रॅम कोबी
  3. १०० ग्रॅम गाजर
  4. ५० ग्रॅम सिमला मिरची
  5. 2 टीस्पूनमीरेपूड
  6. 3 टीस्पूनमीठ
  7. 4 टीस्पूनतेल
  8. १०० मिली लिटर पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    कोबी बारीक चिरुन घेतला. गाजर बारीक किसून घेतले. सिमला मिरची पण बारीक चिरुन घेतली.

  2. 2

    कढई मधे तेलात बारीक चिरलेला कोबी, बारीक किसलेले गाजर आणि बारीक चिरलेली सिमला मिरची घालून परतून त्यात मीठ आणि मीरेपूड घालून पाच मिनिटे परतले. आणि हे मिश्रण गार करायला ठेवले.

  3. 3

    मिश्रण गार होईपर्यंत मैद्यामधे तेल, मीठ आणि पाणी घालून मळून घेतले. मग एका मोठ्या गोळीची पोळपाटावर मोठी पोळी लाटून घेतली. आणि वाटीच्या सहाय्याने त्याच्या गोल पुर्या करुन घेतल्या.

  4. 4

    पुरीमधे कोबीचे मिश्रण घालून त्याच्या कडेला बोटाने पाणी लावलं, यामुळे कडेला सुकत नाही. आणि मोदकाच्या प्रमाणेच पुरीच्या कडेला पाऊण भागात चुन्या पाडून पाव भागाला चुन्या पाडू नका. म्हणजे अजून वेगवेगळ्या आकाराचे मोमोज बनवू शकतो. पुरीचा चुन्या न पाडलेला भाग आणि चुन्या पाडलेला भाग अशा दोन्ही बाजू जवळ आणून, त्या जोडून छान छान आकाराचे मोमोज बनवले.

  5. 5

    मोदका सारखा आकार देऊन मोमोजच्या चुन्या एकमेकांना जोडत मधे अंगठ्याने गोलाकार फिरवून एक आकार दिला‌. दुसऱ्या आकारत गोल लाटीच्या मधे मिश्रण घालून त्या लाटीला चुन्या पाडून बरोबर मधे जोडून त्या चुन्या आडव्या दिशेने जोडून आकार दिला.

  6. 6

    काही मोमोज अगदी मोदकाच्या आकाराचे बनवले. आपल्याला जो आकार करता येईल त्या आकारात मोमोज बनवायचे. ते छानच दिसतात. मग मोदक उकडण्याच्या भांड्याला आतून तेल लाऊन त्यात मोमोज दहा मिनिटे उकडायला ठेवायचे.

  7. 7

    मस्त गरमागरम स्टीम मोमोज शेझवान चटणी बरोबर सर्व्ह करावे. हे चविला खूपच छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes