पोळीचा लाडू (Policha ladoo recipe in marathi)

Samarpita Patwardhan @cook_22384179
#आई.. १.
अतिशय स्तुत्य उपक्रम. आईला समर्पित करायचं . हि भावनाच किती छान आहे.
आज माझ्या आईसाठी मी केला "पोळीचा लाडू". अतिशय सोप्पी साधी रेसिपी. पण तिला आवडणारी. आणि शाळेत आमच्या डब्यातला हमखास मिळणारा खाऊ.
पोळीचा लाडू (Policha ladoo recipe in marathi)
#आई.. १.
अतिशय स्तुत्य उपक्रम. आईला समर्पित करायचं . हि भावनाच किती छान आहे.
आज माझ्या आईसाठी मी केला "पोळीचा लाडू". अतिशय सोप्पी साधी रेसिपी. पण तिला आवडणारी. आणि शाळेत आमच्या डब्यातला हमखास मिळणारा खाऊ.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ४ पोळ्या बारीक करून घेणे. मी मिक्सर मधून काढते म्हणजे छान बारीक होतात.
- 2
नंतर वरील सर्व साहित्य (पोळ्यांचा चुरा, गूळ आणि तूप) छान एकत्र करून घेणे. (आवडीप्रमाणे वेलची पूड, ड्राय फ्रुट पण ऍड करू शकता.)
- 3
नंतर त्याचे छोटे छोटे लाडू करून घेणे. सोप्पा आणि पौष्टीक असा "पोळीचा लाडू" खायला तयार.
Similar Recipes
-
पोळीचा लाडू (Policha Ladoo Recipe In Marathi)
#LORमहाराष्ट्रीयन पोळीचा लाडू रेसिपी हा एक गोड घरगुती मिष्टान्न तयार करण्यासाठी उरलेल्या पोळ्या पासून बनवलेला आणि गूळ घालून गोड करून बनवलेला लाडू आहे. तुमच्या रोजच्या जेवणानंतर सर्व्ह करा. Vandana Shelar -
गूळ तूप पोळीचा लाडू (Gul Tup Policha Ladoo Recipe In Marathi)
#LOR#Left_over_recipe#गूळ_तूप_पोळीचा_लाडू...😋 "अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असं मानणारी आपली भारतीय संस्कृती ...त्यामुळे अन्नाचा कणही वाया जाऊ न देता त्याचा उपयोग करणे ही आपल्याला लहानपणापासून ची शिकवण... यामध्ये शेतकऱ्याने कष्ट घेऊन पिकवलेले धान्य, त्याच्या कष्टाची किंमत, तसंच आपल्या घरातील आई ,आजींनी कष्ट करून शिजवलेले अन्न या दोन्हीचा विचार केला जातो आणि म्हणूनच अन्नाला पूर्णब्रम्हाचा दर्जा , देवी अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो..🙏🌹🙏 त्यामुळे अर्थातच रात्री केलेले जेवण जर उरले असेल तर घरातील सुगरणीचा खरा कस लागून त्या उरलेल्या अन्नातूनही चविष्ट पदार्थ तयार केले जातात आणि अन्नाचा एक शीत ही वाया घालवला जात नाही..थोर ते विचार आणि थोर ती भारतीय खाद्यसंस्कृती..🙏 लेफ्ट ओव्हर रेसिपीज चॅलेंज मध्ये आज मी उरलेल्या पोळ्यांचा झटपट ,पौष्टिक ,खमंग असा गूळ तूप पोळीचा लाडू केला आहे... Taste bhi ..Health bhi...शाळेत मुलांना छोट्या सुट्टीच्या डब्यात हा लाडू आपण बिनधास्त देऊ शकतो कारण मधल्या सुट्टीमध्ये मुलांचे लक्ष जास्तकरून खेळण्यात असते त्यामुळे पटकन लाडू उचलला आणि तोंडात घातला असे होऊन मुलांना खेळायला वेळ मिळाला की मुले आणखीनच खुश होतात..😍 चला तर मग गूळ,जायफळ पावडर घातल्यामुळे झालेल्या खमंग रेसिपी कडे जाऊया. Bhagyashree Lele -
पोळीचा खमंग लाडू (policha Ladoo recipe in Marathi)
जास्तीच्या पोळ्या उरल्यास त्याच करायचं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा पोळीचा खमंग लाडू तुम्ही नक्की करून बघा अत्यंत कमी साहित्य मधे होणारा पण आरोग्यासाठी हितकारक असणारा लाडू Prajakta Vidhate -
पोळीचा आनंदी लाडू(policha ladoo recipe in marathi)
#cooksnap समर्पिता पटवर्धन , माया घुसे, प्रिती साळवी, आम्रपाली येरेकर , ज्योती किंकर ताई आपल्या ** पोळीचा लाडू ** या रेसिपीने आठवणींना उजाळा मिळाला. आजी मी व माझा भाऊयांच्या साठी हा पोळीचा साधाच लाडू पण कितीही खाल्ला तरी आनंद देणारा आहे. आजी स्पेशल असते तिचा हा स्पेशल पदार्थमनात घर केलेला पदार्थ. माझे रिक्रिएशन पाहूया या पदार्थाचे. Sanhita Kand -
उरलेल्या पोळ्यांचे लाडू (Left Over Polyache Ladoo Recipe In Marathi)
#LOR # लेफ्ट ओवर रेसिपीस # माझ्या लहानपणी घरोघरी उरलेले अन्न वाया घालवायचे नाही तर त्यापासुन नविन पदार्थ बनवला जायचा अशा प्रकारे उरलेले अन्नाचा उपयोग केला जायचा चला तर अशाच प्रकार ची गोड रेसिपी माझी आई अनेक वेळा करायची तीच आज मी बनवली आहे. उरलेल्या पोळ्यांचे लाडू चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पोळीचा लाडू (policha laddu recipe in marathi)
#पोळीचा_लाडू ...रात्री केलेल्या 4 पोळ्या शील्लक रीहील्यात म्हणून आज नविन पद्धतीने पोळी लाडू बनवला ...माझी आई बनवायची पोळी बारीक हातानेच करून गूळ ,तूप टाकून लाडू बनवायची ..मी आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवला ...खूपच सूंदर लागतो आणी 2-3 दिवस टीकतो सूद्धा.... Varsha Deshpande -
अहळीवाचे लाडू (Ahlivache ladoo recipe in marathi)
#आई आईला अहळीवाचे लाडू खूप आवडतात.तिच्या वाढदिवसाला तर आम्ही हमखास करतोच.पण आता मदर्स डे निमित्त आईसाठी खास बनवलेले लाडू.. लॉक डाऊन मुळे मला तिच्यापर्यंत ते पोहचवता येणार नाहीत .पण फोटोच्या माध्यामातून ते तिच्यापर्यंत नक्की पोहोचणार. खरं तर मुलांनी आपल्यासाठी काही केले आहे यातच आईला खूप समाधान मिळतं. Preeti V. Salvi -
शिळ्या पोळीचा शाही लाडू (shilya poliche shahi ladoo recipe in marathi)
#cooksnapसमर्पिता पटवर्धन आणि माया घुसे या दोन्ही मैत्रिणींच्या पोळीचा लाडू ह्या रेसिपी मी पहिल्या. मी रेसिपी रीक्रीएट केली. त्यात मी माझ्या आवडीप्रमाणे थोडा बदल केला. हा लाडू करताना पोळी थोडे तूप लावून,तव्यावर कडक करून घेतली ,नंतर मिक्सरमधून फिरवली ,गुळ तूप,ड्राय फ्रूट ,खसखस घातले.त्यामुळे लाडू शाही झाला आणि ज्याप्रमाणे चुर्मा लाडू लागतो त्याप्रमाणे ह्याची टेस्ट आली.खूपच छान लागतो चवीला. Preeti V. Salvi -
-
मॉम्स फेवरेट शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#आईआईला समर्पित असलेली डिशआईला शिरा हा प्रकार अतिशय आवडायचा, खूप जास्त गोड ती शिरा बनवायची,कुणी जर घाईगडबडीत ला पाहुणा आला तर झटपट गोड ती नेहमी शिरा च बनवायची, तीतिच्या लहानपणीच्या मला गोष्टी सांगायची,ती म्हणायची की आमच्या लहानपणी असं काही खूप गोडाचे काही वेगवेगळे प्रकार दुकानात नाही मिळायचे जसे तुम्ही चॉकलेट खता बाहेरून किंवा किंवा तुम्हाला इच्छा झाली तर वेगवेगळे पदार्थ जे दुकानात मिळतात गोडाचे..... असे आमच्या लहानपणी मिळायचे नाही, म्हणून आम्हाला साखर ही खूप जास्त आवडायची, कारण साखर ही अशी गोष्ट होती आमच्या लहानपणी की, एक स्वीट डेझर्ट म्हणून साखर वेळेवर उपलब्ध राहायची, त्याच्यामुळे आम्हाला साखरेचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं,आई सांगायची कि आम्ही लहानपणी लपून छपून साखरेचे बक्के मारायचे, आणि लहानपणी साखर खूप खाल्ल्याने माझे दात पूर्ण खराब झालेत,हे ऐकून मी खूप असायची....म्हणून ती नेहमी सांगत असायची की गोड कमी खा,अशी ही आमची गोड आई तिचा लहानपणी च्या गोष्टी सांगायची...आणि तिच्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप हसू यायचे,छान वाटायचं तेव्हा तिच्या अशा छान लहानपणीच्या गोष्टी ऐकून... Sonal Isal Kolhe -
पंचरत्न लाडू (panchratna ladoo recipe in marathi)
#लाडू आज दहीहंडी,गोपाळकाला म्हणून आज मी हे पौष्टिक पंचरत्न लाडू केले आहे. लहान मुले बीट, दुधी भोपळा,लाल भोपळा, गाजर हे सहसा खात नाही. त्यामुळे असा लाडू करून दिला, की आवडीने खातात. Sujata Gengaje -
मेथीचे लाडू (methiche ladoo recipe in marathi)
#लाडूअतिशय पौष्टिक मेथीचे लाडू थंडीत आवर्जुन केले जातात.पावसाळ्यात वातावरणात थंडावा असताना , बाळंतीण ,स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे लाडू आहेत. Preeti V. Salvi -
गूळ तूप पोळीचा लाडू (gul tup policha laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजगूळ तूप पोळीचा लाडू हल्ली विस्मरणात चालला आहे.पूर्वीच्या काळी मुलांना भूक लागली की आई पटकन पोळी चुरून गुळ पोळी चे लाडू करून द्यायची गुळ तूप पोळीचा लाडू खूप हेल्दी व पौष्टिक असा आहे कारण त्यात गव्हाची पोळी गुळ व तूप असे सर्व शक्तिवर्धक बलवर्धक आहेत.हा लाडू एकदम कमी साहित्य व झटपट होणारा असा आहे चला तर मग बघुया गुळ तूप पोळीचा लाडू. Sapna Sawaji -
रवा खोबऱ्याचे कुकर मधील फटाफट लाडू (rava khobryache ladoo recipe in marathi)
#pcrकुठले ना कुठले लाडू,चिवडा नेहमी खाऊ च्या डब्यात भरलेले असत.आम्हाला लहानपणी प्रश्न पडायचा, आई एवढ्या पटापट कसे आणि कधी पदार्थ बनवते.ती म्हणायची अरे माझ्या मदतीला आहे ना माझा मित्र...कुकर...चुटकी सरशी काम करतो माझी. Preeti V. Salvi -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
बेसन मिल्क पावडर लाडू (BESAN LADU RECIPE IN MARATHI)
#आईमाझ्या आईला बेसन लाडू खूप आवडतात म्हणून आज थोडं वेगळं म्हणून मिल्क पावडर घालून बेसनचे लाडू बनविलेत, खूप छान लागतात. ही रेसिपी आईला समर्पित..... Deepa Gad -
झटपट पोळीचा लाडू (Instant Policha ladoo Recipe In Marathi)
खूप जास्त वेळ नसेल तेव्हा झटपट होणारा हा पदार्थ आहे नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
पोळीचा शीरा (Policha Sheera Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या पोळ्या व शिल्लक राहिलेली रसगुल्ला चाचनी पासून पोळीचा शीरा बनलला आहे .गुलाबजामुनच्या पाकाचा ही उपयोग करू शकतो. Arya Paradkar -
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
कुरमुऱ्याचे लाडू (kurmuryche laddu recipe in marathi)
#KS6जत्रेतले कुरमुऱ्याचे लाडू एकदम मस्त दिसायलाही आणि चवीलाही.लहानपणी हे लाडू खायची माझा काही औरच होती.आम्ही गाव देवी च्या जत्रेला गेलो की हमखास कुरमुऱ्याचे लाडू घ्यायचो.अर्धे अधिक घरी येण्याच्या आधीच संपायचे.कधी प्रसादात कुरमुरे यायचे तेव्हा त्याचा चिवडा किंवा लाडू आई हमखास बनवायची..मध्या वेळेचा खाऊ म्हणून... Preeti V. Salvi -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
चुरमा लाडू (ladoo recipe in marathi)
झटपट आणि पौष्टिक लाडू, कधी जर चपाती / पोळी उरली तर पटकन करता येते. व या साठी जास्त जिन्नस पण लागत नाहीत. जे आहे साहित्य घरात ते वापरून करता येतात. लहान मुलांना जर गोड आवडत असेल तर हा उत्तम पर्याय. मुख्य म्हणजे लहान मुलांचे पोट पण लवकर भरते. अगदी लहान मुलानं पासून ते वयोवृद्ध हे खाऊ शकतात. व अश्या पध्दतीने केले तर तूप पण खूप कमी लागते. Sampada Shrungarpure -
शेंगदाणे लाडू (Shengdane Ladoo Recipe In Marathi)
#महाशिवरात्र_स्पेशल#SR उपवासाच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे शेंगदाणे लाडू हे प्रोटीन्स आणि लोह (iron) यांचे पाँवर हाऊस (Power House) म्हणावे लागेल . शेंगदाणे लाडू ही अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तसेच झटपट होणारी रेसिपी तर आहेच शिवाय ही आबाल वृद्धांनाही अतिशय प्रिय अशी रेसिपी म्हणता येईल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीसाठी तर शेंगदाणा लाडू हे वरदानच म्हणता येईल. मला आठवतंय लहानपणी आम्ही दुपारच्या वेळी एका वाटीत दाणे आणि गूळ घेऊन खात असू . छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय म्हणून शेंगदाणे लाडूची निवड करता येईल तसेच जेवण झाल्यावर काहीतरी गोड खावे अशी इच्छा होते त्यावेळेस साखरेला पर्याय म्हणून हा एक छोटा लाडू बिनधास्त खावा. शेंगदाणे लाडू हवाबंद डब्यामध्ये दोन महिने आरामात टिकतात. हे जरी खरे असले तरी डब्यातले लाडू इतक्या लवकर कधी संपतात हे कळत देखील नाही. Bhagyashree Lele -
दुधीचा पेठा (dudhicha petha recipe in marathi)
#आईदुधी म्हटल्यावर लगेच आठवतो तो हलवा. पण माझ्या माहेरी कोहळा खात नसल्याने आईसाठी बनवलेली ही पाककृती. सासरी वाडीत दुधीची लागवड केली जाते, तेव्हा कधी एखादा दुधी बाजूला राहिल्यामुळे जून होत असे. तेव्हा या जून दुधीचा पेठा करता येईल का ? असा मनात विचार आला आणि हा पदार्थ तयार झाला. माझ्या आईला नवनविन पदार्थ बनविण्याची आवड असल्याने हा पदार्थ तिला आणि माझ्या सासूबाईंना समर्पित ! Darpana Bhatte -
बेसन लाडू (besan laddoo recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बेसन लाडू मी दरवर्षी दामट्यांचे लाडू आणि मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा घरीच बनवायची आलेल्या पाहुण्यांसाठी..पण यावर्षी थोडी तब्बेतीची कुरकुर चालू असल्याने या वर्षी फक्त बेसन लाडू बनवले व चिवडा रेडिमेड आणला आहे.. लता धानापुने -
उपवासाचे भरीत
एकादशी आणि दुप्पट खाशी अशी मराठी मधे म्हण आहे तिला खर ठरवण्यासाठी सगळया माझ्या कडून १ छान चटपटीत, गोड, तिखट, खमंग व पटकन होणारा पदार्थ आहे हा. लहान मुलांना सुधा आवडतो. अगदी घरी असलेल्या साहित्य एकत्र करून बनवू शकतो. हा पदार्थ तुम्ही थालिपीठं सोबत किंवा नुसता सुधा खाऊ शकता. #उपवास GayatRee Sathe Wadibhasme -
पोळीचा लाडू
#Masterclassझटपट होणारा पदार्थ शिवाय सकाळच्या पोळ्या नसणार खाणार तर झटपट स्वीट डिश तयार होते Maya Ghuse -
कणिक पोहे लाडू (kanik pohe ladoo recipe in marathi)
लाडू गूळ आणि पोहे घालून केल्यामुळे healthy and crunchy लागतात#MPPदीपाली भणगे
-
तहान लाडू भूक लाडू (laddu recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीया आधुनिक युगात अनेक असे पदार्थ आहे जे पौष्टिक, हेल्दी असून देखील काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली आहे.. म्हणूनच मला असे वाटते की या काळातही या पदार्थांचं असणं तितकच गरजेचे आहे.त्यात थोडासा बदल करून हेच पदार्थ आपण आपल्या घरच्यांना खाऊ घालू शकतो...असाच एक पदार्थ जो काळाच्या ओघात मागे पडला आहे आणि तो म्हणजे *तहान लाडू भूक लाडू* किंवा पोळीचा लाडू....मला आठवतंय आम्ही लहान असताना राहिलेल्या पोळीचा लाडू आई अगदी पाच मिनिटात करून, हातावर द्यायची. लगेच पोळीचा चुरा करून, त्यात गुळाचा किस घातला की लाडू तयार... तेव्हा आपण काहीही काकू न करता आवडीने खायचो.पण आताची पिढी म्हणजे बाप रे बाप..🙉 म्हणूनच मग जूनीच रेसिपी त्यात थोडा बदल करून त्यांच्यासमोर प्रेसेंट केली तर आवडीने खातात. पोळीचा लाडू करताना आपण हाताने चुरा करून गूळ घालून लाडू करतो. पण तसे न करता मी चपातीला छान तूप लावून कडक करून भाजून घेतले. असे केल्याने या लाडवांची चव अगदी बेसनाच्या लाडवा सारखी येते आणि खूपच वेगळी आणि भन्नाट अशी चव लागते आणि असा केलेला लाडू जवळजवळ आठ दिवस टिकतो.... तेव्हा नक्की ट्राय करा *तहान लाडू भूक लाडू*... 💃 💕 Vasudha Gudhe -
बाजरी ची खीर (bajrichi kheer recipe in marathi)
#बाजरीचीखीर सातारा म्हटलं की आठवत बाजरीचा खिचडा पण आज मी बाजरी ची खीर बनवली आहे खूप छान झाली होती चव तर अप्रतिम 👌👍😊 Rajashree Yele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12434246
टिप्पण्या