अहळीवाचे लाडू (Ahlivache ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#आई आईला अहळीवाचे लाडू खूप आवडतात.तिच्या वाढदिवसाला तर आम्ही हमखास करतोच.पण आता मदर्स डे निमित्त आईसाठी खास बनवलेले लाडू.. लॉक डाऊन मुळे मला तिच्यापर्यंत ते पोहचवता येणार नाहीत .पण फोटोच्या माध्यामातून ते तिच्यापर्यंत नक्की पोहोचणार. खरं तर मुलांनी आपल्यासाठी काही केले आहे यातच आईला खूप समाधान मिळतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/4 कपअहळीव
  2. 1 कपनारळाचे पाणी/साधे पाणी
  3. 1 कपखवलेला नारळ
  4. 3/4 कपगुळ...आवडीनुसार कमी जास्त
  5. 1/4 टीस्पूनवेलची,जायफळ पूड
  6. 1 टेबलस्पूनड्राय फ्रुट तुकडे किंवा पावडर
  7. सजावटीसाठी मगज बी...आवडीचे ड्राय फ्रुट वापरावे

कुकिंग सूचना

  1. 1

    अहळीव निवडून, पाण्यात १ तासभर भिजत ठेवले.छान फुगून दुप्पट होतात.गुळ चिरून घेतला.

  2. 2

    पॅन मध्ये भिजलेले अहळीव, चिरलेला गुळ आणि खवलेला नारळ,त्यासोबत ड्राय फ्रूट घालून छान मिक्स केले.मी ड्राय फ्रूट पावडर केली व त्यात वेलची दाणे आणि किसलेले जायफळ एकत्रच मिक्स करून ते घातले आहे.

  3. 3

    मिश्रण चांगले आटून, साधारण पॅन पासून सुटू लागले आणि त्याचा गोळा तयार होऊ लागला की गॅस बंद केला.तयार मिश्रण ताटात काढून कोमट असतानाच त्याचे लाडू वळून घेतले.

  4. 4

    आवडीचे ड्राय फ्रूट लाऊन लाडू सजवले.मी मगज बियांचा वापर केला आहे.तयार आहेत मदर्स डे निमित्त आईसाठी अहळीवाचे... तिच्या आवडीचे लाडू..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes