गूळ तूप पोळीचा लाडू (Gul Tup Policha Ladoo Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#LOR

#Left_over_recipe

#गूळ_तूप_पोळीचा_लाडू...😋

"अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असं मानणारी आपली भारतीय संस्कृती ...त्यामुळे अन्नाचा कणही वाया जाऊ न देता त्याचा उपयोग करणे ही आपल्याला लहानपणापासून ची शिकवण... यामध्ये शेतकऱ्याने कष्ट घेऊन पिकवलेले धान्य, त्याच्या कष्टाची किंमत, तसंच आपल्या घरातील आई ,आजींनी कष्ट करून शिजवलेले अन्न या दोन्हीचा विचार केला जातो आणि म्हणूनच अन्नाला पूर्णब्रम्हाचा दर्जा , देवी अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो..🙏🌹🙏 त्यामुळे अर्थातच रात्री केलेले जेवण जर उरले असेल तर घरातील सुगरणीचा खरा कस लागून त्या उरलेल्या अन्नातूनही चविष्ट पदार्थ तयार केले जातात आणि अन्नाचा एक शीत ही वाया घालवला जात नाही..थोर ते विचार आणि थोर ती भारतीय खाद्यसंस्कृती..🙏
लेफ्ट ओव्हर रेसिपीज चॅलेंज मध्ये आज मी उरलेल्या पोळ्यांचा झटपट ,पौष्टिक ,खमंग असा गूळ तूप पोळीचा लाडू केला आहे... Taste bhi ..Health bhi...शाळेत मुलांना छोट्या सुट्टीच्या डब्यात हा लाडू आपण बिनधास्त देऊ शकतो कारण मधल्या सुट्टीमध्ये मुलांचे लक्ष जास्तकरून खेळण्यात असते त्यामुळे पटकन लाडू उचलला आणि तोंडात घातला असे होऊन मुलांना खेळायला वेळ मिळाला की मुले आणखीनच खुश होतात..😍 चला तर मग गूळ,जायफळ पावडर घातल्यामुळे झालेल्या खमंग रेसिपी कडे जाऊया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
6 सर्व्हिंग्ज
  1. 3-4रात्रीच्या उरलेल्या पोळ्या
  2. 1/2 कपगूळ किंवा गुळ पावडर कमी-जास्त आवडीनुसार
  3. 3 टिस्पून साजूक तूप
  4. 2 टीस्पूनकाजू बदाम पिस्ते पावडर
  5. 1/2 टी स्पूनजायफळ पावडर

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एके ठिकाणी गोळा करून घ्यावे.

  2. 2

    आता पोळ्यांचे तुकडे करून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पोळ्यांचे तुकडे गूळ आणि तूप घालून पोळ्यांचा बारीक चुरा करून घ्या.

  3. 3

    आता हे मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या. आणि त्यामध्ये काजू बदाम पिस्ते पावडर, जायफळ पावडर, हवं असल्यास तूप घालून व्यवस्थित एकत्र करा.

  4. 4

    आता वरील मिश्रण हाताने चांगले मळून घ्या आणि नंतर त्याचे हव्या त्या आकारात लाडू वळून घ्या.

  5. 5

    तयार झाले आपले चविष्ट खमंग पौष्टिक असे गुळ तूप पोळीचे लाडू...हा लाडू असाच गट्टम करा किंवा गरम दुधाबरोबर सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes