एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..
तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..
कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्‍या होत्या
लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,
आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...
मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...
पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदी
बनवावी,,,
मला नेहमी प्रमाणे बनवायची,,
नव्हती काही तरी वेगळे करुया...
दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..
मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..
त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.
तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..
तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...
मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..
तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..
मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..
आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईल
मुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...
माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली....

एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)

#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..
तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..
कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्‍या होत्या
लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,
आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...
मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...
पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदी
बनवावी,,,
मला नेहमी प्रमाणे बनवायची,,
नव्हती काही तरी वेगळे करुया...
दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..
मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..
त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.
तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..
तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...
मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..
तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..
मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..
आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईल
मुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...
माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
  1. 1मोठा पिकलेला आंबा
  2. 1 कपकिसलेले खोबरे
  3. 15,20मनुका
  4. 2 कपकॉर्नफ्लॉवर
  5. 3 कपदूध
  6. 5 टेबल स्पूनसाखर

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    मनुका दोन तीन तासापूर्वी कोमट पाण्यात भिजत घालून देणे...
    ओव्हर नाइट मनुका भिजत ठेवला तर फार चांगले,,
    छान तो मुरेल....आंब्याचा रस करून तो फ्रीजमध्ये ठेवून देणे,
    आणि काही आंब्याच्या फोडी सजावटीसाठी चिरून ठेवणे..

  2. 2

    एका भांड्यामध्ये तीन कप दूध घेणे...
    आता दुधाला चांगलं उकळू देणे... आणि तीन कप दुधाचं दोन कप दूध होऊ देणे इतका दूध आटवून घेणे....
    आता एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेने, दोन-तीन चमचे त्याच्यामध्ये पाणी घालून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्या.., आणि दूध मध्ये हळूहळू कॉर्नफ्लॉवर चे बॅटल घालत राहावे, तीन चमचे साखर घालावी..
    कॉर्नफ्लॉवर चे बॅटल दुधामध्ये टाकताना दुधा मध्ये चमचा घोटत राहणे,,, असे नाही केले तर खालून तळाला कॉर्नफ्लॉवर चिटकून बसेल आणि त्याच्या गुठळ्या बनतील...

  3. 3

    आता या दुधाला पाच, सहा उकळ्या आल्या की गॅस बंद करून द्यायचा.. बॅटल हे घट्ट झालेलं असेल....
    हे बॅटल थंड झालं की फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवून द्यायचे, खुप चिल्ड होण्यासाठी...

  4. 4

    रस आणि कॉर्नफ्लॉवर याचा बॅटल फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी आपण ठेवून दिलेले आहे...
    आता तोवर आपण खोबरं किसून घेणे....
    आंब्याच्या फोडी चिरून ठेवणे...
    ही तयारी करून ठेवावी

  5. 5

    आता भिजलेला मनुका, एक टेबल स्पून साखर आणि किसलेले खोबरे हे मिक्सर मधून चांगले बारीक करून घ्यावे..
    आता यामध्ये फ्रिजमध्ये ठेवलेले कॉर्नफ्लॉवर चे बॅटल मिक्सर मधून चांगले फिरवून चांगले मिक्स करून घेणे....

  6. 6

    आंब्याचा रस पण मिक्सरमधून एक टेबल्स स्पून साखर घालून चांगले मिक्स करून फिरवून घेणे...आता एक काचेचा ग्लास घेणे,
    त्यामध्ये आधी आंब्याची लेअर घालावी, त्यानंतर मनुका आणि खोबऱ्याचं वाटल घालावे...
    परत तिसरा लेयर आंब्याचा रसाचा घालायचा,,
    आणि आंब्याच्या फोडी, मनुका आणि पिस्ता, ने गार्निश करायचे..
    तुम्हाला हवे तसे तुम्ही गार्निश करावे....

  7. 7

    आता छान छान आपली आंबा, खोबरा, मनुका याची छान मॅंगो स्मूदी रेडी आहे....
    आणि ही मॅंगो स्मूदी मी इनोवेट केलेली आहे,,,
    त्याची कल्पना पूर्णपणे माझी आहे... याला पूर्णपणे माझाच टच आहे,,,,
    खूप खूप चविष्ट आणि पौष्टिक,"मँगो स्मूदी," आहे, ही करून बघा तुम्हालाही आवडेल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes