परदा/पोटली व्हेज बिर्याणी (parda biryani veg recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#बिर्याणी
बिर्याणी म्हणाताच डोळ्यासमोर मस्त सुवासिक रंगांची उधळण असलेला पदार्थ आठवतो. बनवतानाच घरभर बिर्याणीचा सुवास दरवळत असतो. आणि आपली भुक चाळवते. वन डिश मील म्हणून पण बिर्याणी खायला बरी आहे. एकच केलं की काम भागलं. पण ही बिर्याणी करणं तसं बरंच वेळखाऊ काम आहे. आणि एवढं करुन ती चांगली झाली की समाधान मिळतं. यावेळी परदा बिर्याणी मी पहिल्यांदाच बनवली. जी बिर्याणी बनवली ती बंद आवरणात होती. ती बघून मुलांची उत्सुकता वाढली. पण एक एक कोन जसा उलगडत गेला. तसतसा घरभर सुगंध दरवळायला लागला. आणि बिर्याणी खाल्ल्यावर तर घरचे सगळेच खुष झाले. अगदी रेस्टॉरंट मधे मिळते तशीच टेस्टी लागली. बिर्याणीचा परदा म्हणजेच खरपूस भाजलेली पोळी पण तंदूरी रोटीच लागते म्हटत मुलांनी आवडीने खाल्ली. अंकिता रावतेंनी यावेळी साप्ताहिक थीम दिल्यामुळे मला बिर्याणी बनवायचा उत्साह आला. यामुळे अंकिता यांचे मी खूप खूप आभार मानते 🙏 आणि या परदा बिर्याणीला पोटली बिर्याणी असेही म्हणतात. या बिर्याणीची रेसिपी पुढे देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एकूण वेळ ४० मिन
४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम तांदूळ
  2. ५० ग्रॅम मैदा
  3. २५० ग्रॅम कांदे
  4. २०० ग्रॅम टोमॅटो
  5. १५० ग्रॅम बटाटे
  6. ५० ग्रॅम वाटाणे
  7. ५० ग्रॅम गाजरं
  8. २५ ग्रॅम काजू
  9. 1 टीस्पूनमीरे
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 इंचदालचिनी
  12. 1/2 टीस्पूनलवंग
  13. 2हिरवी वेलची
  14. 2तमालपत्र
  15. 1चक्रीफूल
  16. 2 टीस्पूनकोथिंबीर
  17. 2 टीस्पूनपुदिन्याची पाने
  18. 2 टीस्पूनतिखट पूड
  19. 1 टीस्पूनहळद
  20. 1 टीस्पूनधणे-जीरे पूड
  21. 1 टीस्पूनगरम मसाला
  22. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  23. 2 टीस्पूनबिर्याणी मसाला
  24. 2 टीस्पूनकेशराचे पाणी
  25. 3 टीस्पूनमीठ
  26. 2 टेबलस्पूनतेल
  27. 2 टेबलस्पूनदही
  28. 2 टेबलस्पूनतूप
  29. 2 टीस्पूनबिर्याणी इसेन्स

कुकिंग सूचना

एकूण वेळ ४० मिन
  1. 1

    एका मोठ्या भांड्यात धुतलेले तांदूळ घालून त्यात पाणी घातले (२ वाट्या तांदळा साठी साडेतीन वाट्या पाणी घातले), मग त्यात जीरे, लवंग, दालचिनी, स्टारफूल, मीरे, मीठ आणि तूप घालून मिक्स करुन कुकरममधे ठेवले आणि एक शिट्टी काढून तो भात एका मोठ्या प्लेटमधे काढून फॅनखाली गार करायला ठेवला.

  2. 2

    फ्लावर, गाजर आणि बटाट्याच्या फोडी करुन ठेवल्या,‌‌‌ वाटाणे सोलून घेतले. मग ते सर्व पाणी घालून भाज्य थोडा वेळ वाफवून घेतल्या.

  3. 3

    एका पॅनमधे तेल घालून त्यात काजू तळून घेतले. आणि त्यातच उभा बारीक चिरलेला कांदा पण बाऊन होईपर्यंत परतून घेतला.

  4. 4

    नंतर एका कढईमधे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून त्यात तिखट पूड, हळद, धणे-जीरे पूड, मीठ, गरम मसाला पावडर, आणि बिर्याणी मसाला घालून चांगले परतून त्यात दही, चाट मसाला आणि १ टीस्पून बिर्याणी इसेन्स घालून चांगले परतून घेतले. मग त्यात कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने हाताने तोडून घातली.

  5. 5

    दही घातलेला मसाला चांगला परतून घेतला. आणि त्यात वाफवलेल्या भाज्या घालून अलगद परतले.

  6. 6

    नंतर एका मोठ्या कढईमधे तूप घालून त्यात अगदी खाली शिजवून गार केलेला मोकळा भात घातला.‌ त्यावर परतलेल्या भाज्या घालून त्यावर २ टीस्पून तूप घालून परतले. मग त्यावर तळलेले काजू, परतलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने आणि बिर्याणी इसेन्स, गरम मसाला घातला. आणि त्यावर परत शिजवून गार केलेला मोकळा भातचा लेअर लावला.

  7. 7

    भातावर भिजवून ठेवलेले केशराचे पाणी घातले. आणि परत त्यावर तळलेले काजू, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि २ टीस्पून तूप घालून त्यावर झाकण ठेवले. मग गॅसवर तवा ठेवून त्यावर बिर्याणीची कढई ठेवून वाफ काढली.

  8. 8

    एका वाटी मधे मैदा घालून त्यात मीठ आणि पाणी घालून जरा सैलसर मळून घेतले. आणि पोलपाटावर मोठी पोळी लाटून घेतली.

  9. 9

    एका फ्राइंग पॅनमधे तूप लावून त्यावर लाटलेल्या पोळीचा त्रिकोण करुन ठेवला. म्हणजे पोळी तव्यामधे उघडताना चिकटणार नाही. मग पोळी पूर्णपणे उघडून त्यात बिर्याणी भरली.

  10. 10

    बिर्याणी भरल्यानंतर बाजूच्या पोळीने झाकून बंद करावे. आणि त्यावर दुसरा पॅन झाकून ठेवावा. मग खालची बाजू खरपूस भाजली की मग वरची बाजू अलगद दुसऱ्या पॅधमधे घालून ती बाजू पण आता शेकवून घ्यावी. अशा तर्हेने बिर्याणीला पोळीचा परदा लावून बंद करुन घ्यावा.

  11. 11

    छान खरपूस भाजून घेतलेली परदा बिर्याणी एका प्लेटमधे अलगद काढून घ्यावी. आणि सुरीच्या सहाय्याने बंद असलेल्या बिर्याणीचा एक एक त्रिकोण कापून पूर्ण बिर्याणी उघडावी.

  12. 12

    बिर्याणीचा परदा एक एक त्रिकोणात उघडत असतानाच खूप सुंदर दिसते आणि बिर्याणीचा मस्त सुगंध दरवळायला लागतो. मग एका वाटी मधे दही घालून त्यात तिखट पूड, मीठ, चाट मसाला आणि पुदिन्याची चटणी घालून दुसऱ्या बाऊलमधे उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लिंबाची फोड ठेवून मस्त खमंग अशी परदा/पोटली बिर्याणी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes