हैद्राबादी व्हेज  दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#बिर्याणी हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी बनविण्याचा योग आज कूकपॅड मुळे आला. मस्त टेस्ट झाली 😋😋बिर्याणी करतेवेळी घरात जो बिर्याणीचा सुगंध दरवळतो ना आहाहा क्या बात!!👌👌

हैद्राबादी व्हेज  दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)

#बिर्याणी हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी बनविण्याचा योग आज कूकपॅड मुळे आला. मस्त टेस्ट झाली 😋😋बिर्याणी करतेवेळी घरात जो बिर्याणीचा सुगंध दरवळतो ना आहाहा क्या बात!!👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपदही
  2. 1 टिस्पून धनिया पावडर
  3. 1 टेबल स्पूनतिखट
  4. 2 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. 3हिरवी मिरची
  7. 1/2 टेबल स्पूनमीठ
  8. तीन-चार टेबलस्पून कोथिंबीर
  9. दोन-तीन टेबलस्पून पुदिना
  10. 1/2 टी स्पूनहळद
  11. भाज्या चिरलेल्या-
  12. 1गाजर
  13. 1आलू
  14. 1बाऊल कापलेल कॉलिफ्लॉवर
  15. 1शिमला मिरची
  16. भातासाठी-
  17. अडीच कप बासमती तांदूळ (30 मिनिट भिजून घेतलेले)
  18. 6 (7 कप)पाणी
  19. 1 टीस्पूनजिरे
  20. 1 टेबलस्पूनतेल
  21. 1 टिस्पून लिंबूचा रस
  22. 1 टेबल स्पूनमीठ
  23. बिर्याणी तयार करण्यासाठी-
  24. 4 टेबलस्पूनतूप
  25. 1 टीस्पूनजिरे
  26. 3 टेबलस्पूनकाजूचे काप
  27. 3,4विलायची
  28. तीन-चार लवंग
  29. 1दालचिनी तुकडा
  30. 1 टेबल स्पूनआद्रक लसुन टेस्ट
  31. 1/2 कपतळलेले कांदे
  32. 1/2 कपदही
  33. 1 चतुर्थांश कप पाणी
  34. 3,4केसर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम बासमती तांदूळ याला स्वच्छ धुऊन तीस मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. तोपर्यंत वरील दिलेल्या सर्व भाज्यांचे काप करून घ्यावेत. कांदे लालसर तळून घ्यावे. आता एका बाऊल मध्ये दही टाकून त्यामध्ये धनिया पावडर, तिखट, बिर्याणी मसाला,मिरची,हळद, पुदिना,कोथिंबीर,मीठ हे सगळ टाकून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता या मिश्रणामध्ये चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकून परत छान मिक्स करून बाजूला ठेवून द्याव्यात. म्हणजेच मॅरीनेट करून ठेवाव्यात.

  3. 3

    आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे व त्या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि एक टीस्पून तेल टाकावे पाणी छान उकळलं की त्यामध्ये बासमती राइस टाकावा. व बासमती राइस जास्त शिजू देऊ नये म्हणजेच अर्धा कच्चा ठेवावा. अर्धा कच्चा शिजल्यावर एका चाळणी मध्ये काढून त्यातले पाणी निथळून घ्यावे.

  4. 4

    नंतर गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तूप टाकावे व त्या तुपामध्ये काजूचे तुकडे, दालचिनी, लवंग, विलायची हे सगळं क्रमाक्रमाने टाकावे. काजू छान लालसर झाले की त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकावी. मग त्यामध्ये मॅरीनेट केलेल्या भाज्या टाकाव्यात. त्या जास्त वेळ शिजू देऊ नयेत. क्रंची होईस्तो वरच शिजु द्याव्यात. नंतर त्यामध्ये तळलेला कांदा टाकावा.

  5. 5

    भाज्या बुडाला लागू नये म्हणून थोडं पाणी टाकावे. आता एका पातेल्यात थोडी भाजी काढून घ्यावी. मग चाळणीत ठेवलेला बासमती राइस ची एक लेयर भाजी वर द्यावी त्या नंतर परत या भातावर तळलेला कांदा वेगळी काढून ठेवलेली भाजी यांची एक लेयर द्यावी.

  6. 6

    मग वरती भाताची परत एक लेयर द्यावी व त्यावर तळलेला कांदा केसर पाणी व तूप टाकावे व कमी गॅसवर एक लोखंडी तवा ठेवून त्यावर कुकर ठेवून तीस मिनिटे बिर्याणी होऊ द्यावी. आधी लोखंडी तवा मोठ्या गॅसवर छान गरम होऊ द्यावा ज्यावेळी कुकर ठेवतो तेव्हा गॅसला कमी करावं.

  7. 7

    तीस मिनिटानंतर आपली बिर्याणी रेडी खाण्यासाठी सर्व्ह करावी. खूप जबरदस्त झाली बिर्याणी.👌👌😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes