मुघलई शाही चिकन दम बिर्याणी(mughlai shahi chicken dum biryani recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

#बिर्याणी

मुघलई शाही चिकन दम बिर्याणी(mughlai shahi chicken dum biryani recipe in marathi)

#बिर्याणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
4/6 सर्व्हिंग्ज
  1. 800 ग्रॅमचिकन
  2. 4 कपबासमती तांदूळ
  3. 6कांदे पातळ कापले
  4. 4तमालपत्र
  5. 3ब्राऊन वेलची
  6. 4हिरवी वेलची
  7. 1/2 इंचदालचिनी
  8. 4लवंगा
  9. 2 चमचेशहाजिरे
  10. 1/2 टीस्पूनजायफळ
  11. 1/2 टीस्पूनगदा
  12. 1 टीस्पूनमिरपूड
  13. 2 टीस्पूनलाल तिखट
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 2 टीस्पूनधणे पूड
  16. 5हिरव्या मिरच्या
  17. 20 ग्रॅमआले
  18. 16लसूण फ्लेक्स
  19. 1 कपकोथिंबीर
  20. 2टोमॅटो चिरले
  21. 1 टीस्पूनकेशरचे कोळे दुधात विरघळले
  22. 1 कपदही
  23. 1/2 कपतूप
  24. चवीनुसारमीठ
  25. 1 कपपुदीना
  26. 1/2 टीस्पूनखायचा रंग

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    चिकन साठी- आले लसूण,पेस्ट घाला त्यामधे हळद, मीठ लाल तिखट,आणि दही एकत्र करून घ्या.कोंबडीत घालावा. चांगले मिक्स करावे आणि 1 तासासाठी बाजूला ठेवा.
    मोठ्या फ्राईंग पॅनमध्ये तेल सुमारे 2 मिनिटे गरम करा, कांदे आडवे कट करा, प्रत्येक बॅचला 3/4 चमचे मीठ घालावे आणि कांदे गोल्डन ब्राऊन व कुरकुरीत होईपर्यंत तळा.

  2. 2

    कुरकुरीत तळलेले कांदे बाजुला ठेवा. मध्यम आचेवर त्याच पॅनमधे तेलात कांदे,आले लसूण टोमॅटो घाला. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.मिक्सरला वाटाव.अता एकां भांड्यामधे
    तेल घाला. तेलात सुमारे 5 मिनिट मॅरीनेट केलेल चिकनला परतुन घ्या. 5 कप पाणी घाला.मध्यम आचेवर शिजवा.चिकन शिजल की चिकनमधे मिक्सरच वाटन घालावे.सर्व मसाला परतुन घ्या.चिकन मसाला,गरम मसाला,सर्व मसाले घाला.कोथिंबीर घाला.

  3. 3

    तांदळासाठी
    तांदूळ धुवा आणि पाण्यात 15 मिनिटे भिजवा.4 कप तांदळासाठी 6 वाटी पाणी घालून, वेलची तपकिरी आणि हिरवी, जिरे, लवंगा, तमालपत्र, मीठ आणि दालचिनीची काडी घाला.ते व्यवस्थित शिजल्यानंतर तांदूळ काढा आणि थाळी किंवा मोठ्या पॅनवर पसरवा.

  4. 4

    एका भांड्यामधे २ चमचे तूप घाला. शिजवलेल्या तांदळाचा थर त्यानंतर चिकनचा थर ठेवा. तळलेल्या कांद्याचा थर ठेवा, शिजवलेल्या तांदळाच्या थरासह पुन्हा चिकन आणि नंतर तांदळाच्या थरासह समाप्त करा. थोडे तूप, केशर, तळलेले कांदे आणि पुदीना पाने शिंपडा. 15 मिनिटे कमी आचेत ठेवू शकता.अता त्यावर दम देउन सर्व करु शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

Similar Recipes