इडली सांबार (idli sambar recipes in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#रेसिपीबुक
#week1
माझ्या आवडत्या रेसिपीज पैकी साउथ इंडियन डिशेस हा प्रकार नेहमीच असतो.
म्हणूनच पहिली रेसिपी बुक ची डिश इडली सांबर तयार केले.

इडली सांबार (idli sambar recipes in marathi)

#रेसिपीबुक
#week1
माझ्या आवडत्या रेसिपीज पैकी साउथ इंडियन डिशेस हा प्रकार नेहमीच असतो.
म्हणूनच पहिली रेसिपी बुक ची डिश इडली सांबर तयार केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. इडलीच्या बॅटर करिता
  2. 3 कपतांदूळ
  3. 1 कपउडदाची डाळ
  4. 1 चिमूटमेथीदाणे
  5. 1 कपशिजलेला भात
  6. 3 ग्लासपाणी
  7. सांबर करिता
  8. 1कांदा
  9. 2 टीस्पून तिखट
  10. 1कढीपत्त्याचे पान
  11. 1टोमॅटो
  12. 2हिरव्या मिरच्या
  13. 1वांगं
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनहिंग
  16. 2 टीस्पूनमीठ
  17. 2 कपतुरीची डाळ
  18. 2 टीस्पूनचिंचेचा कोळ
  19. 1 टीस्पूनगुळाची पावडर
  20. 2 ग्लासपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यात तांदूळ उडदाची डाळ मेथी दाणे भिजवून घ्यावे. या मिश्रणाला तीन ते चार तास भिजू द्यावे. चार तासानंतर याला मिक्सी मध्ये फिरवून घ्यावे. मिक्सरमधे फिरवताना शिजलेला भात ऍड करावा. हे मिश्रण एक दिवस फर्मेंट होऊ द्यावे. इडलीचे बेटर रेडी आहे. या मिश्रणात मीठ आणि एक चमचा तेल घालून फिरवून घ्यावे. इडलीपात्राला तेल लावून ग्रीसिंग करून घ्यावे. त्यात इडलीचे बेटर टाकून त्यावर तिखट स्प्रिंकल करावे. इडलीचे पात्र स्टीमिंग साठी झाकून ठेवावे. दहा मिनिटे इडली शिजू द्यावी.

  2. 2

    दहा मिनिटानंतर आपली इडली रेडी आहे.
    एकीकडे तुरीची डाळ करण्यासाठी कुकरमध्ये शिजवून घ्यावे.

  3. 3

    एक कढई गॅसवर ठेवावे व त्यात तेल तापायला ठेवावे.
    त्यात तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कांदा मिरची आणि कडीपत्त्याचे पाने शिजू द्यावे.
    कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर चे टोमॅटो आणि वांगं ॲड करावे.
    हे सगळ्या भाज्या छान शिजू द्याव्या.

  4. 4

    सर्व भाज्या शिजल्यानंतर त्यात सांबार मसाला तिखट हळद आणि हिंग ॲड करावे.
    मीच आणि चिंचेचा कोळ सुद्धा ॲड करावा.
    दोन मिनिटे चमच्याने हलवत रहावे व त्यात शिजलेले वरण ऍड करावे.
    गरज असल्यास थोडे पाणी ॲड करावे व मिश्रण छान उकळी येऊ द्यावे.
    उकळी आल्यानंतर त्यात गुळाची पावडर ऍड करावी.
    आपला सांबार रेडी आहे.
    इडली आणि सांबार या दोघांना एकटाच गरम गरम सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Ankita Khangar तुमची इडली सांबार रेसिपी मी बनवली ( कुकस्नॅप ) केली खुप मस्त टेस्टी झाली👌
धन्यवाद अनिता🙏

Similar Recipes