पालक गरगटी/ मुद्दा भाजी (paalak gargatti recipes in marathi)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
लातूर

#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी  हि रेसिपी मुख्यतः मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक भागाची खासियत... त्यातल्या त्यात कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांमध्ये आवर्जून केली जाणारी... माझ्या गावी म्हणजे लातूर जिल्हा मध्ये माझ्या लहानपणी लग्नामध्ये हि भाजी पंगतीत वाढली जायची आणि घरी वरचेवर हि भाजी होत असली तरी लग्नात पंगतीत बसून ह्या भाजीवर ताव मारताना जाम मजा यायची... हि माझी आवडती डीश आहे.. काळ बदलला आणि लग्नात तोरा मिरवणाऱ्या या भाजीची जागा पनीर च्या भाज्यांनी घेतली. ..हि एक आंबट गोड आठवण आहे... रेसिपी करुन बघा नक्की

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५-३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1जूडी पालक
  2. 1 वाटी तूरडाळ
  3. 2 टेबलस्पूनहरभरा डाळ
  4. 2 टेबलस्पूनकच्चे शेंगदाणे
  5. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला नारळ
  6. चवीनुसारगूळ
  7. चवीनुसारमीठ
  8. 3 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  9. 5-6बारीक चिरलेली हिरवी मिरची
  10. 1 टेबलस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  11. 3 टेबलस्पूनबेसन
  12. 1मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  13. 1/2 टीस्पून जीरे
  14. 1/2 टीस्पूनमोहरी
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. 5-6कढीपत्ता पाने
  17. 1/2 टीस्पून हळद
  18. 1 चिमटीभर हिंग

कुकिंग सूचना

२५-३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. कुकरच्या डब्या मध्ये तूरडाळ आणि हरभरा डाळ धुवून घ्या आणि त्यामध्ये चिरलेला पालक, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, बारीक चिरलेला नारळ आणि गरजेनुसार पाणी आणि थोडे मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. मध्यम आचेवर ४ शिट्ट्या काढून गॅस बंद करावा

  2. 2

    कुकर होईपर्यंत चिंचेच्या कोळात बेसन कालवून घ्यावे आणि फोडणीची तयारी करुन घ्या.

  3. 3

    शिट्ट्या झालेल्या की गॅस बंद करून कुकर गार झाल्यावर डबा बाहेर काढावा आणि शिजलेली डाळ हलक्या हाताने मिक्स करावी.

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता गूळ अद्रक लसूण पेस्ट घालून मंद आचेवर परतून घ्या. त्यात शिजलेली डाळ घाला. २ मिनिटे शिजू द्या.

  5. 5

    २ मिनीटांनी भाजीमध्ये चिंचेचा कोळ आणि बेसन चे मिश्रण टाकून चांगले मिक्स करावे आणि ५ मिनिटे झाकून मंद आचेवर शिजू द्यावे. गॅस बंद करा. भाजी तयार आहे. हि भाजी चपाती, भाकरी, पूरी आणि भात, या सगळ्या सोबत मस्त लागते. करुन बघा enjoy and stay healthy 😊🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
रोजी
लातूर
मी एक खादाडी 😊😁😜🙏
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes