उपमा (upama recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#रेसिपीबूक
#प्रेमाला#उपमा#नाही
#सहजसोप्पआपलसं

उपमा (upama recipe in marathi)

#रेसिपीबूक
#प्रेमाला#उपमा#नाही
#सहजसोप्पआपलसं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 1 कपमध्यम रवा
  2. 1/2 कपमटार
  3. 2टोमॅटो
  4. 3कांदे
  5. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर
  6. 1/4 कपशेंगदाणे
  7. १०-१५ किसमिश
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. ८-१० कढीपत्ता पाने
  10. 1 टीस्पूनउडीद डाळ (भिजवलेली)
  11. 1/4 टीस्पूनमोहरी
  12. 1/4 टीस्पूनजिरे
  13. 1/4 टीस्पूनहिंग
  14. 1 टीस्पूनसाखर
  15. चवीनुसारमीठ
  16. अर्ध्या लिंबाचा रस
  17. 2 कपपाणी
  18. 1 टी स्पूनसाजूक तूप
  19. 3 टी स्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य बारीक चिरून घ्या. उडीद डाळ पाण्यात भिजून ठेवा. कढई मंद आचेवर गरम होऊ द्या, यांत तेल घालून मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करून घ्या. फोडणी तडतडली की शेंगदाणे व उडीद डाळ घाला. शेंगदाणे लालसर झाले की यांत मिरची व कढीपत्ता घाला. नंतर कोथिंबीर देखील घाला.

  2. 2

    फोडणी खमंग झाली की यांत कांदा व वाटाणे घाला आणि परतून घ्या. यांवर किशमिश घाला आणि नंतर रवा घालून भाजून घ्या. रव्याचा रंग बदलू लागला की टोमॅटो घाला आणि छान परतवत रहा.

  3. 3

    रव्यावर मीठ व साखर पेरून एकजीव भाजा. दूसऱ्या गॅस वर रव्याच्या दुप्पट पाणी उकळवून घ्या. भाजलेल्सा रव्यावर हळू हळू पाणी सोडा. एका हाताने ढवळत रहा म्हणजे गुठळी होणार नाही.

  4. 4

    एकजीव झालेल्या उपम्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. नंतर झाकण काढून लिंबु पिळून घ्या. वरून एक चमचा तूप सोडा म्हणजे उपमा मऊ होईल व स्वाद ही छान येईल. पुन्हा चमच्याने ढवळून घ्या व गॅस बंद करा.

  5. 5

    गरमागरम उपमा शेव पेरून सर्व्ह करा. मी शेव घेतली नाही, आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes